Video: महिलेचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचा जवान झाला स्पायडर मॅन!

Video: महिलेचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचा जवान झाला स्पायडर मॅन!

Video: महिलेचा जीव वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचा जवान झाला स्पायडर मॅन!

सध्या सोशल मीडियावर एका अग्निशमन दलाच्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील अग्निशमन दलाच्या जवानाने स्पायडर मॅनसारखे अनोख्या पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केले आहे. हा अग्निशमन दलाचा जवान न्यूयॉर्कमधील आहे. अलीकडेच न्यूयॉर्कमधील अग्निशमन दलाच्या विभागाने एका उंच इमारतीला लागलेल्या आगीवर वेगळ्या पद्धतीने नियंत्रण मिळवले. तेव्हापासून अग्निशमन दलाच्या या जवानाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कच्या अग्निशमन दलाच्या विभागाला मॅनहॅटनमधील अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यावर या अपार्टमेंटच्या १६ व्या मजल्यावरील खिडकीतून एक महिला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ओरडत होती. त्यावेळेस त्या जवानाने तिला वाचवण्यासाठी कधीही न केलेले रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे ठरविले आणि तो दोरी बांधून इमारतच्या छतावर गेला. त्या जवानाने स्वतःच्या जीवाची परवा न करता छतावरून १६ व्या मजल्यावरील खिडकीतून जाऊन त्या महिलेचा जीव वाचवला.

या इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने ही घटना पाहिल्यानंतर अग्निशमन दलाच्या त्या जवानाला स्पायडर मॅन आणि सुपरमॅनची उपमा दिली. हा व्हिडिओ न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने आपल्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


हेही वाचा – निरोगी राहण्यासाठी दिवसातून ७ वेळा करतो मुत्रप्राशन; नाक-कान-डोळ्यांनाही लावतो मुत्र


 

First Published on: September 4, 2020 11:21 PM
Exit mobile version