…..म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात घालावे लागले हेल्मेट!

…..म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात घालावे लागले हेल्मेट!

आपण वाहन चालवताना सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करत असतो. मात्र या हेल्मेटचा वापर ऑफिसमध्ये देखील केला जातो. हो हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर ऑफिसमध्ये हेल्मेट घालून बसलेल्या कर्मचाऱ्यांचा फोटो व्हायरल होतं आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा येथील वीज वितरण विभागातील कर्मचारी हेल्मेट घालून काम करताना या व्हायरल फोटो मध्ये दिसतं आहे.

कर्मचाऱ्यांनी फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे हेल्मेट घातलं आहे. या मागचं कारण असं आहे की, ऑफिसची इमारत ही कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटत नाही. एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुरक्षित नसलेल्या या ऑफिसच्या इमारतीतील सर्व कर्मचाऱ्यांचा फोटो शेअर केला आहे. ‘ बांदा येथील विद्युत वितरण विभागातील कर्मचाऱ्यांनी अनुचित घटना टाळण्यासाठी हेल्मेट घातलं आहे. एक कर्मचारी असं म्हणाला की, ‘मी इथे २ वर्षांपासून काम करत आहे. या इमारतीची स्थिती अजूनही तिच आहे. आम्ही अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे पण अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही.’

तुम्ही पाहू शकता की फोटो या इमारतीची किती वाईट परिस्थिती आहे. कर्मचाऱ्यांना कागदपत्रे ठेवण्यासाठी एखादा खण देखील नाही. सर्व कागदपत्रे ही पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये आहेत. सतत तक्रार करूनही अधिकारी या इमारतीबाबत कोणतीही दखल घेत नाही आहेत. त्यामुळे या सुरक्षित नसलेल्या इमारतीमध्ये हेल्मेट घालून काम करणे हा कर्मचाऱ्यांसाठी शेवटचा उपाय आहे.


नक्की वाचा – मुख्यमंत्र्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ला नेटिझन्सचं ‘पुन्हा येऊ नका’ने उत्तर!


 

First Published on: November 4, 2019 7:36 PM
Exit mobile version