घरट्रेंडिंगमुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन'ला नेटिझन्सचं 'पुन्हा येऊ नका'ने उत्तर!

मुख्यमंत्र्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ला नेटिझन्सचं ‘पुन्हा येऊ नका’ने उत्तर!

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ट्वीटर नेटिझन्सने नाकारलं असून #RejectFadnavisForCM असा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे.

राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नसताना ट्वीटरवर मात्र विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मात्र वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातल्या सत्तास्थापनेची गणितं जुळवण्यासाठी दिल्लीत असताना नेटिझन्सनी आत्ताच मुख्यमंत्र्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे. #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंडिंगमध्ये आला आहे. ‘मी पुन्हा येईन’, असं कंठरवाने प्रत्येक सभेमध्ये सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच ‘पुन्हा येऊ नका’ असं नेटिझन्स सांगत आहे. त्यासाठी प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असून कुणी आरेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना नाकारत आहे, तर कुणी राज्याच्या विकासदराविषयी तक्रार करत आहेत. पण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना नाकारल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

काहींनी आरेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांवर परखड टीका केली आहे.

- Advertisement -

काहींनी मुख्यमंत्र्यांनी ‘मी पुन्हा येईन’, असं म्हणताता उद्धटपणा दाखवल्याची तक्रार केली आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -