क्रिकेट खेळला असाल, पण ‘असं’ नाही! पाहून लोटपोट व्हाल!

क्रिकेट खेळला असाल, पण ‘असं’ नाही! पाहून लोटपोट व्हाल!

म्युझिकल क्रिकेटचा व्हायरल व्हिडिओ

क्रिकेट हा भारताचा धर्म आहे असं बोललं जातं. देशातल्या जवळपास प्रत्येक दुसऱ्या माणसाला क्रिकेटमध्ये रस असतो. क्रिकेटच्या नावाखाली सगळे धर्म, जात, पंथ विसरून एकत्र येतात. कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या खेळाडूला सपोर्ट करतात. त्यामुळे या देशाच्या नसानसांत क्रिकेट भिनलंय की काय? असं चित्र अनेकदा उभं राहातं. पण या देशाचं क्रिकेट वेड म्हणा किंवा क्रिकेट प्रेम, किती असू शकतं याची साक्ष पटवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही तरूण क्रिकेट खेळताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल यात विशेष ते काय? पण हे तरूण चक्क एका स्टेजवर क्रिकेट खेळत आहेत! आणि त्याहून विशेष म्हणजे गाण्याच्या बीटवर हे सगळे खेळाडू क्रिकेट खेळत आहेत!

व्हिडिओ नक्की कुठला?

वास्तविक हा व्हिडिओ नक्की कुठला आहे? याची कल्पना व्हिडिओ पाहून येत नाही. मात्र, गाण्यांच्या तालावर त्यांचं क्रिकेट संपूर्ण व्हिडिओमध्ये धम्माल उडवून देत आहे. साधारणपणे एखाद्या कार्यक्रमातला किंवा डान्स स्पर्धेमधला हा व्हिडिओ असल्याचं दिसत आहे. तसेच, आयएसएस नावाच्या एखाद्या संस्थेला किंवा कॉलेजला हा ग्रुप रिप्रेझेंट करत असावा असं देखील व्हिडिओच्या शेवटी दिसत आहे. पण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांची कल्पनाशक्ती आपल्याला अचंबित करते!


पाहा काय करतोय महेंद्रसिंह धोणी – माही आणि जिवाचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल!

अॅक्शन रिप्लेदेखील गाण्याच्या बीटवर!

या व्हिडिओमध्ये क्रिकेटच्या मॅचची प्रत्येक गोष्ट गाण्याच्या बीटवर करण्यात आली आहे. बॉलिंग, बॅटिंग, फील्डिंग, अंपायर इतकंच काय, अॅक्शन रिप्ले देखील गाण्याच्याच बीटवर दिसत आहे. प्रत्येक बीटवर त्यांनी केलेली अॅक्शन अगदी बीटला साजेशी वाटत आहे.

पाहा यांचा कल्ला!

 


हेही एकदा वाचा – ‘या’ महान माणसाला दंडवतच घालायला हवा!
First Published on: December 9, 2018 8:35 PM
Exit mobile version