हत्येप्रकरणी पोलिसांनी कोंबड्याला केली अटक, कोर्टात होणार सुनावणी

हत्येप्रकरणी पोलिसांनी कोंबड्याला केली अटक, कोर्टात होणार सुनावणी

हत्येप्रकरणी पोलिसांनी कोंबड्याला केली अटक, कोर्टात होणार सुनावणी

तेलंगणामध्ये एक विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील जगतियाल जिल्ह्यात सोमवारी यल्लमा मंदिरात कोंबड्याची झुंज सुरू होती. याचदरम्यान, झुंज बघणाऱ्या सतीश या ४५ वर्षीय व्यक्तीवर कोंबड्याने हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे आरोपी म्हणून पोलिसांनी कोंबड्याला ताब्यात घेतलं असून लवकरच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तेलंगणामध्ये कोंबड्यांच्या झुंजीवर बंदी आहे. तरीही २२ फेब्रुवारीला जगतियाल जिल्ह्यातील लोथनूर गावात यल्लमा मंदिरात कोंबड्याच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोंबड्यांच्या पायाला चाकू बांधण्यात आले होते.

यामुळे कोंबड्याला धड नीट चालताही येत नव्हते. त्याचदरम्यान तेथे बसलेल्या सतीशच्या अंगावर कोंबड्याने उडी मारली. यामुळे कोंबड्याच्या पायाला बांधलेला चाकू सतीशच्या मांडीत रुतला व रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर सतीशला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या साक्षीनंतर पोलिसांनी कोंबड्याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली . सध्या हा कोंबडा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची व्यवस्थित बडदास्त ठेवण्यात आली आहे.


हेही वाचा-  कुत्र्यावरून दोन गटात राडा, ९ जण जखमी

 

First Published on: February 27, 2021 4:08 PM
Exit mobile version