मातृ देवो भव: आईच्या आठवणीने मूल कासावीस, घराबाहेरच उभारल मंदिर

मातृ देवो भव: आईच्या आठवणीने मूल कासावीस, घराबाहेरच उभारल मंदिर

मातृ देवो भव:! जगात आईची जागी कोणीही घेऊ शकत नाही. आई आहे तोवर जगातील सर्व सुखे आहे असे म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात आईला विशेष स्थान आहे. आई नाही तर जगातील सर्व गोष्टी व्यर्थ असे देखील म्हटले जाते. अशाच आईविना पोरक्या झालेल्या मुलांसाठी वडिलांनी आपल्या पत्नीचे थेट मंदिरच उभारले आहे. शाजापूर जिल्ह्यातील सांपखेडा गावातील हे मंदिर पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत.

बंजारी समाजात राहणारे नारायण सिंह राठोड त्यांची पत्नी गीताबाई आणि मुलांसह राहत होते. त्यांचे कुटुंब हे मध्यमवर्गीय कुटुंब होते. गीताबाई यांना धार्मिक कार्यक्रमांची विशेष आवड होती. त्या सतत भजन किर्तनात रमलेल्या असायच्या. कुटुंबातील सदस्य गीताबाई यांना देवी समान समजत होत्या. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गीताबाई यांचा मृत्यू झाला.

गीताबाईंच्या निधनाची वार्ता त्यांची मुलांना सहन होत नव्हती आईच्या आठवणीने मुले कासावीस होत होती. मुलांना पुन्हा पहिल्यासारखे कसे करता येईल यावर विचार करुन नारायण सिंह यांनी आपल्या पत्नीचे घराबाहेर मंदिर बांधले. गीताबाईंच्या मुलाने सांगितल्याप्रमाणे, आईच्या जाण्याने आमचा संपूर्ण परिवार तुटला. त्यामुळे आम्ही आईची आठवण म्हणून तिची मूर्ती तयार करण्याचा निर्णय घेतला. आईच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी आई सारखा हुबेहुब मूर्ती तयार करण्याची ऑर्डर दिली. राजस्थानमधील एका कलाकाराने आम्हाला आईची मूर्ती तयार करुन दिली.

गीताबाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याला मंदिराचे स्वरुप देण्यात आले. घरातील सदस्य दररोज गीताबाईंच्या मुर्तीची पूजा करतात. अनेक जण गीताबाईंचे मूर्ती पाहण्यासाठी येत आहे. आई केवळ आमच्याशी बोलत नाही पण ती सतत आमच्या सोबत आहे, असे त्यांच्या मुलांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – World Rose Day 2021: कॅन्सरग्रस्त आणि ‘वर्ल्ड रोज डे चे’ कनेक्शन काय? जाणून घ्या इतिहास, महत्त्व

First Published on: September 27, 2021 11:05 AM
Exit mobile version