World Rose Day 2021: कॅन्सरग्रस्त आणि ‘वर्ल्ड रोज डे चे’ कनेक्शन काय? जाणून घ्या इतिहास, महत्त्व

World Rose Day 2021
World Rose Day 2021

फेब्रुवारी म्हणजेच रोझ डेपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते. या दिवशी आपल्या जोडीदाराला गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केले जाते. फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’ वीकमध्ये असणाऱ्या ‘रोज डे’ विषयी सगळ्यांना माहितीच असेलच. पण या व्यतिरिक्त २२ सप्टेंबर रोजी देखील ‘वर्ल्ड रोझ डे’ साजरा केला जातो हे फार मोजक्या लोकांना माहित असावं. या दिवशी कर्करोगग्रस्तांना गुलाबाची फुले दिली जातात. या दिवशी त्यांना गुलाबाचे फुल देण्यामागचे कारण थोडे वेगळे असते. जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल आणि पुन्हा जीवन जगण्याची आशा त्यांच्यात निर्माण होईल.

कर्करोगाशी झुंज देत असलेल्या लोकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी दरवर्षी २२ सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड रोझ डे’ साजरा केला जातो. तसेच, या दिवशी रुग्णांना आठवण करून दिली जाते की ते या लढाईत एकटे नाहीत. कॅन्सर हा एक वेदनादायक रोग आहे जो रुग्णाला अत्यंत असुरक्षित बनवतो. म्हणून‘वर्ल्ड रोझ डे’ त्यांना या प्राणघातक आजाराशी लढण्यासाठी प्रोत्साहित करतो. या खास दिवसाबद्दल खास गोष्टी जाणून घ्या.

अशी झाली या दिवसाची सुरूवात

कॅनडामधील १२ वर्षाच्या मेलिंडा रोजच्या स्मरणार्थ World Rose Day साजरा केला जातो. या मुलीला १९९४ मध्ये केवळ १२ वर्षांची असताना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाला होता. त्यावेळी ती जीवन आणि मृत्यू यांच्यात झगडत होती. डॉक्टरांनीही आशा सोडली होती आणि कुटुंबाला सांगितले की, ती फक्त २ आठवडे जीवन जगू शकेल, परंतु या लहान मुलीने हार मानली नाही आणि जीवनाची लढाई जिंकली. मेलिंडा रोज हिला खूप लवकर ब्लड कॅन्सर झाला. तिने आपल्या सहा महिन्यांच्या काळात तिने ब्लड कॅन्सरशी निकराची झुंज दिली.

मेलिंडाला अस्किन ट्युमर हा ब्लड कॅन्सर झाला होता. पण शेवटच्या श्वासापर्यंत तिनी अजिबात हार मानली नाही. या दिवसात तिने आपल्या सकारात्मकतेने तिला पाठिंबा देणाऱ्यांना हसतं ठेवलं. यानंतर मेलिंडा साधारण ६ महिने जगली, परंतु सप्टेंबर महिन्यात तिने जगाला निरोप दिला. या मुलीने ६ महिने आपल्या आजाराशी ज्या प्रकारे झुंज दिली. आणि ती मुलगी कर्करोगग्रस्तांसाठी एक उदाहरण बनली. म्हणूनच आज कर्करोगाच्या रुग्णांना म्हणजेच कर्करोगग्रस्तांना गुलाबाची फुले दिली जातात, जेणेकरून या गंभीर आजाराविरूद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारे धैर्य, मनोबल त्यांच्यातीन वाढेल