Corona New Normal: लग्नात मास्कने घेतली वरमाळेची जागा; व्हिडिओ व्हायरल

Corona New Normal: लग्नात मास्कने घेतली वरमाळेची जागा; व्हिडिओ व्हायरल

Corona New Normal: लग्नात मास्कने घेतली वरमाळेची जागा; व्हिडिओ व्हायरल

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे माणसाच्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत. मास्क, सॅनिटायझर यासारख्या गोष्टी खूप गरजेच्या झाल्या आहे. कोरोनाचा परिणाम सण-उत्सवापासून अनेक समारंभावर झाला आहे. लग्न सोहळ्यावर याचा परिणाम अधिक झाला असून लग्न सोहळ्याचे रुप अगदी बदलून गेले आहे. थाटामाटात पार पडणार लग्न सोहळा आता अवघ्या ५० माणसांच्या उपस्थित होता. आता लग्न सोहळ्यामधील वरमाळेची जागा देखील मास्कने घेतल्याचे दिसत आहे. यासंबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक लग्न सोहळ्याचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकांना हे व्हिडिओ खूप आवडतात. अशाच प्रकारचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये लग्नात वरमाळेची जागा मास्क घेतल्याचे दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या लग्नाचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी मजेशीर कॅप्शन लिहिले आहे की, ‘जयमालच्या की जगह मास्क माला’ व्हिडिओमध्ये पाहू शकता की, नवरा-नवरी स्टेजवर उभे आहेत आणि ते दोघे एकमेकांना वरमाळा घालण्याऐवजी मास्क घालत आहेत. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाचा हसू येत आहे, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना कोरोनासंबंधित जागरूकतेचा संदेश दिला आहे.

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. कारण व्हिडिओ जरी मजेशीर असला तरी लोकांना सुरक्षेविषयी काळजी घेण्याबाबतचा संदेश देखील यातून दिला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करून काही तास झाले आहेत. आतापर्यंत ४१ लाईक्स मिळाले असून ३९० पेक्षा अधिक जणांनी व्हिडिओ पाहिला आहे.


हेही वाचा – लस घेण्यासाठी ‘या’ दिवशी मिळणार Rapido टॅक्सीची फ्रि राईड


 

First Published on: June 15, 2021 5:19 PM
Exit mobile version