Railways Recruitment: १०वी पास आहात! लेखी परीक्षेशिवाय होणार ३,११९ पदांची भरती!

Railways Recruitment: १०वी पास आहात! लेखी परीक्षेशिवाय होणार ३,११९ पदांची भरती!

Railways Recruitment

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या इच्छुकांसाठी अर्ज करण्याची ही उत्तम संधी असून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम मध्य रेल्वे (WR) यांनी ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज करू शकतात. पश्चिम मध्य रेल्वे (West Central Railway) करता ५६१ जागा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) Sport Quota २६ जागा, मध्य रेल्वे (CR) मध्ये २,५३२ पदांवर भरती असणार आहे. म्हणजेच ही होणारी भरती एकूण ३ हजार ११९ पदांसाठी असणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, आयटीआय प्रमाणपत्र देखील असणं आवश्यक आहे.

वयाची मर्यादा

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे असणार आहे. मात्र ज्यामध्ये किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय मर्यादा २५ वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच आरक्षित वर्गाला नियमानुसार सूट देण्यात येणार आहे. वरील पदांवर अर्ज करण्यासाठी रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थीं उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर दहावीच्या गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमधील या पदांमध्ये इच्छुक उमेदवार २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२१ आहे. तर मध्य रेल्वेच्या पदावर अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२१ असणार आहे.


First Published on: February 11, 2021 1:36 PM
Exit mobile version