IRCTC Apprentice 2021: दहावी पास आहात! नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी करा आजच अर्ज

IRCTC Apprentice 2021: दहावी पास आहात! नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी करा आजच अर्ज

जर तुम्ही दहावी पास आहात तर तुम्हाला IRCTC मध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत तिकीट, खानपान आणि पर्यटन सेवा पुरवणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी IRCTC मध्ये प्रशिक्षणार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आले. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदासाठी १०० अपरेंटिसशिप पदं रिक्त असून तुम्ही या पदावर काम करण्यास इच्छुक असाल तर आजच अर्ज करा. IRCTC अपरेंटिसशिप अंतर्गत निघालेल्या जाहिरातीतील १०० ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी किमान इयत्ता १० वीची परीक्षा किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज

IRCTC मध्ये ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी भारत सरकारच्या apprenticeshipindia.org च्या apprenticeship संकेतस्थळावर भेट देणं आवश्यक आहे. या संकेतस्थळांवर भेट दिल्यानंतर उमेदवारांना प्रथम त्यांचे नाव नोंदणी करावी लागेल. यावर नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासारखी माहिती देणं आवश्यक आहे.

१५ महिन्यांसाठी असेल अॅप्रेंटिसशिप

अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी, अर्जाच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर, त्यांना १५ महिन्यांसाठी अॅप्रेंटिसशिप देण्यात येईल, त्या दरम्यान मूलभूत प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर १२ महिने नोकरीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांना ७ हजार ते ९ हजार रुपये दरमहा वेतन देण्यात येणार आहे. तसेच, त्यांना NAPS चे फायदे दिले जातील. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना आठवड्यातून ६ दिवस काम करावे लागेल.


अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची पुन्हा छापेमारी

First Published on: September 17, 2021 6:04 PM
Exit mobile version