घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची पुन्हा छापेमारी

अनिल देशमुखांच्या घरावर आयकर विभागाची पुन्हा छापेमारी

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर आयकर आज पुन्हा छापेमारी केली आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांही छापेमारी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूरमधील घरांवर आणि त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. नागपूरातील देशमुखांचे निवासस्थान, तर नागपूरच्या काटोलमधील निवासस्थान, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थान आणि NIT कॉलेजवर आयकर विभागाने छापेमारी करत झाडाझडती केली. यासोबतच नागपूरच्या हॉटेल ट्राव्होटेल येथे देखील आयकराने छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

यापूर्वी सीबीआय आणि ईडीने छापेमारी करत देशमुख्यांच्या घरातील अनेक महत्वाची कागदपत्रे हस्तगत केली. याशिवाय दिल्ली आणि मुंबईतील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकत चौकशी सुरु केली आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना अनिल देशमुखांविरोधात एक पत्र लिहिले होते. या पत्रात सिंग यांनी देशमुख्यांनी गृहमंत्री पदावर असताना पोलिस खात्यातील वाझेसारख्या अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलवत मुंबईतील हॉटेल, बार, रेस्टॉरंट मालकांकडून दरमहिना १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचे आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससेमिरा सुरु झाला आहे. काही दिवसांपूर्वी मनी लॉड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर ईडीने छापे केली होती.

ईडीने चौकशीसाठी अनिल देशमुख यांना जवळपास पाच वेळा समन्स सुद्धा बजावले. मात्र, अनिल देशमुख अद्याप ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यातच आता इन्कम टॅक्स विभागाच्या छापेमारीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -