वर्षाला ९० लाख रुपये मिळवून देणाऱ्या सुल्तान रेड्याचे निधन, मालकाला मोठा धक्का

वर्षाला ९० लाख रुपये मिळवून देणाऱ्या सुल्तान रेड्याचे निधन, मालकाला मोठा धक्का

मर्सिडीज कारपेक्षा महागडा रेडा म्हणून काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या पंजाबमधील सुल्तान (Sultan Bull) रेड्याचे निधन झाले आहे. पंजाबच्या हरियाणा ( Hariyana) कैथल (Kaithal) जिल्ह्यात या रेड्याची चांगलीच चर्चा रंगली होती. रेडा पशुमेळाव्यात सुल्तान या रेड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.  रेडा पशुमेळाव्यात सुल्तानवर २१ कोटींची बोली लावण्यात आली होती. सुल्तानचा मालक बेनीवाला याला सुल्तानच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. बेनीवालाचे सुल्तानवर विशेष प्रेम होते. इतकेच नाही तर सुल्तानमुळे मालक बेनीवाला हा प्रसिद्धीझोतात आला होता होता. सुल्तानमुळे बेनीवाला याला वर्षाला ९० लाखांहून अधिक फायदा होत होता. ह्रदयविकाराच्या झटक्याने सुल्तानचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. (kaithal harayana sultan bull dies due to heart attack)

सुल्तानच्या माध्यमातून बेनीवाला याला वर्षाला ९० लाखांचा नफा होत होता. कारण सुल्तानचे वीर्य हे देशभरात लाखो रुपयांना विकले जात होते. सुल्तानच्या एका वीर्यचा डोस हा सुमारे ३० हजार रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीला विकला जात होता. गेल्या अनेक वर्षापासून सुल्तानच्या वीर्याची देशभरात मोठी मागणी होती. सुल्तानची स्वत:ची वेगळी अशी ओळख होती. सुल्तान दिसायला ही अतिशय देखणा होता. त्यामुळे अनेकांसाठी सुल्तान हा आकर्षणाचा विषय होता. त्याला पाहण्यासाठी देखील बेनीबाला यांच्या घरी गर्दी होत.

सुल्तान दररोज १५ किलो सफरचंद खायचा

सुल्तानला सुदृढ ठेवण्यासाठी बेनीवाला यांनी अनेक वर्ष प्रचंड मेहनत घेतली होती. गेली १४ वर्ष ते सुल्तानची देखभाल करत होते. अगदी लक्झरी आयुष्य सुल्तानच्या वाट्याला आले होते. सुल्तानचा एका दिवसाचा खर्च हा तब्बल २ हजार रुपये इतका होता. सुल्तानचा रोजचा आहार पाहून सर्वांच धक्का बसेल. सुल्तान दररोज १५ किलो सफरचंद आणि १० लीटर दूध पित असे. त्याचप्रमाणे ड्राय फ्रुट्स, हिवाळ्याच्या मोसमात दररोज १० किलो गाजार, केळी, तुपाचे सेवन सुलतान करत होता.

अनेक स्पर्धांमध्ये सुल्तानची हजेरी

 

सुल्तान हा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय होता. त्याने अनेक स्पर्धांमध्ये देखील हजेरी लावली होती. २०१३मध्ये झज्जर,कर्नाल आणि हिसार येथे झालेली राष्ट्रीय पशु सौंदर्य स्पर्धा सुल्तान जिंकला होता. रेडा पशुमेळाव्यात सुल्तानवर २१ कोटींची बोली देखील लावण्यात आली होती.


हेही वाचा – HBD Google: २३ वर्षांचं झालं गूगल, Birthday केक सोबत शेअर केलं खास Doodle

First Published on: September 27, 2021 2:59 PM
Exit mobile version