फेसबुकवर करोना नावाच्या इतक्या आहेत व्यक्ती!

फेसबुकवर करोना नावाच्या इतक्या आहेत व्यक्ती!

फेसबुकवर करोना नावाच्या इतक्या आहेत व्यक्ती!

चीनमधील वुहान या शहरातून उदयास आलेला करोना व्हायरसने जगभरात थैमान घातल आहे. या करोना व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढ आहे. भारतात आतापर्यंत करोना व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याच करोना व्हायरसचा नावाच्या व्यक्ती देखील जगात अस्तित्वात आहे. तुम्हाला हे खोटं वाटेल पण हे खरं आहे. सध्या आपण करोना कीवर्ड सर्च केला तर करोना बाबतच्या अनेक बातम्या येतात. मात्र तुम्ही जर करोना असं नाव फेसबुकवर सर्च केलं तर तुम्हाला करोना नावाच्या अनेक व्यक्तीचे अकाऊंट दिसतील. जेसिका करोना, जाझमीन करोना, सँड्रा करोना, सबरीना करोना अशा व्यक्तीचे फेसबुकवर अकाऊंट आहेत. त्यामुळे सध्या करोना नावाच्या या व्यक्तींना सर्वात जास्त सर्च केलं जात आहे.

देशात सध्या करोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशात एकूण ११४ करोना बाधित रुग्ण असून महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा हा ३९वर पोहचला आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी, धार्मिक स्थळांवर गर्दी न करण्याचे आवाहन, वर्क फ्रॉम होम, माहितीपर जाहिराती प्रसारित करणे असे अनेक निर्णय घेऊन करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


हेही वाचा – क्रेडिट-डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल; जाणून घ्या फायदे आणि तोटे


 

First Published on: March 16, 2020 9:19 PM
Exit mobile version