घरट्रेंडिंगक्रेडिट-डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल; जाणून घ्या फायदे आणि तोटे

क्रेडिट-डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल; जाणून घ्या फायदे आणि तोटे

Subscribe

क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरक्षित आणि सोयिस्कर बनवण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आल्याचे म्हटले आहे.

क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमांमध्ये आजपासून बदल करण्यात आले आहेत. क्रेडिट आणि डेबिट कार्ड सुरक्षित आणि सोयिस्कर बनवण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आल्याचे म्हटले आहे. या नियमांमुळे वापरकर्त्यांना काही फायदे तसेच तोटे होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार सुरक्षित बनवण्यासाठी दोन्ही कार्ड्स इश्यू किंवा रिइश्यू करण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. आरबीआयचे नवे नियम प्रिपेड गिफ्ट्स कार्ड आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाहीत.


हेही वाचा – मुंबईत ५२८ नागरिकांमध्ये करोना सदृश्य लक्षणे; घरीच थांबण्याचे आदेश

दरम्यान, आता क्रेडिट कार्ड यूझर्स कुठल्याही क्षणी आपल्या कार्डला सुरु किंवा बंद करु शकतात तसेच ट्रान्झॅक्शनमध्ये बदल करु शकता. यासाठी ते मोबाईल अॅप्लीकेशन किंवा इंटरनेट बँकिंक किंवा आयव्हीआरचा आधार घेऊ शकतात. सुरक्षेची खबरदारी म्हणून, जर ग्राहक आपल्या कार्डच्या स्टेटसमध्ये काही बदल करत असेल किंवा दुसरे काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर बँक एसएमएस/इमेलद्वारे ग्राहकांना सतर्क करेल आणि माहिती पाठवेल.

- Advertisement -

परदेशात कार्ड वापरता येणार नाही

डेबिट आणि क्रेडिट कार्ड इश्यू किंवा रिइश्यू करताना ते फक्त भारतातील एटीएम आणि पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्सवर व्यवहारासाठी लागू करा, अशा सुचना आरबीआयने बँकांना दिल्या आहेत.

सर्व कार्ड्सना नियम लागू

डेबिट-क्रेडिट कार्ड ग्राहक आहात आणि तुम्ही अद्याप तुमच्या कार्डने कुठलेही ऑनलाईन, कॉन्टॅक्टलेस आणि परदेशात व्यवहार केले नसतील, तर तुमच्या कार्डवरील या सेवा १६ मार्चपासून आपोआप रद्द होणार आहेत. सात दिवसात मोबाईल अप्लीकेशन, लिमिट मॉडिफाय करण्यासाठी बँकेने अनेबल आणि डिसेबल पर्याय उपलब्ध करण्यास सांगितले आहेत, असे आरबीआयने सर्व बँकांना सांगितले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -