…म्हणून आनंद महिंद्रा यांनी शेअर केला दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवणाऱ्याचा व्हिडिओ

…म्हणून आनंद महिंद्रा यांनी शेअर केला दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवणाऱ्याचा व्हिडिओ

...म्हणून आनंद महिंद्रा यांनी शेअर केला दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवणाऱ्याच्या व्हिडिओ

सध्या लॉकडाऊनच्या दरम्यान सोशल मीडियावर अनेक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीला दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवताना पाहिलं आहे का? पण एका व्यक्तीने ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या व्यक्तीने फक्त दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवला आहे. हा व्हिडिओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा हे नेहमी सोशल मीडियावर Active असतात. त्यांनी हा व्हिडिओ नुकताच शेअर केला असून त्यांनी अर्थव्यवस्था कशी संतुलित करता येईल हे सांगितलं आहे. ते म्हणाले की, रोडच्या नियमांचं हे नक्कीच उल्लंघन आहे. पण सोमवारच्या सकाळी मी या फोटोला आशा म्हणून पाहत आहे. कारण दोन चाकांशिवाय कदाचित आपण आपल्या अर्थव्यवस्थेला संतुलन बनवत पुढे नेण्यासाठी रस्ता शोधू शकतो.

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच २ हजारपेक्षा अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी देखील आनंद महिंद्रा यांनी एका रिक्षा वाल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. रिक्षावाल्याने लढवलेली आयडीयाची कल्पना आनंद महिंद्रा यांना भयंकर आवडली होती.


हेही वाचा – Video: भयावह! माकडाने चिमुरडीला नेले फरपडत; पाहून तुम्हालाही बसेल धडकी!


 

First Published on: May 4, 2020 11:22 PM
Exit mobile version