घरट्रेंडिंगVideo: भयावह! माकडाने चिमुरडीला नेले फरपटत; पाहून तुम्हालाही बसेल धडकी!

Video: भयावह! माकडाने चिमुरडीला नेले फरपटत; पाहून तुम्हालाही बसेल धडकी!

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान अनेक प्राण्यांचा संचार रस्त्यावर दिसून येत आहे. रस्त्यावर माणसं नसल्यामुळे जंगलात राहणारे प्राणी आता रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसत आहे. सध्या एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओतलं माकडाचं कृत्य पाहून तुम्हाला धडकी बसेल.

या व्हिडिओमध्ये माकड भरधाव वेगात एका बाईकवरून येताना दिसत आहे. ते माकड आपली बाईक सोडून बेंचवर बसलेल्या चिमुरडीला फरपटत नेताना दिसत आहे. ही घटना पाहून काही नेटकरी हैराण झाले आहेत. पीटर या ट्विटर युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

हा १५ सेकंदाचा व्हिडिओ इंडोनेशियाचा असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये बाईकवरून आलेल्या माकडाने बेंचवर बसलेल्या चिमुरडीला उडी मारून फरपटत नेताना दिसत आहे. मात्र त्याचवेळेस आजूबाजूची लोक जोरात ओरडतात आणि त्यामुळे ते माकड त्या चिमुकलीला सोडून पळ काढत.

- Advertisement -

हा व्हिडिओ अमेरिकेतला बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅन याने देखील शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १२ मिलियनपेक्षा अधिक व्यूज मिळाले असून ४ हजारपेक्षा अधिक लाईक्स आहेत. काहीजण हा व्हिडिओ पाहून हा चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न असल्याच बोलत आहे.

या व्हिडिओवर नेटकरी काय म्हणाले ते वाचा….


हेही वाचा – लवकरच Mi 10 5G भारतात लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -