‘या’ देशात झाला ‘उंदरांचा पाऊस’, व्हिडिओ झाले व्हायरल

‘या’ देशात झाला ‘उंदरांचा पाऊस’, व्हिडिओ झाले व्हायरल

'या' देशात झाला 'उंदरांचा पाऊस', व्हिडिओ झाले व्हायरल

पाऊस हा असा ऋतू आहे, जो काहींना आठवतो, तर काही लोकांना तो अजिबात आवडत नाही. पावसामध्ये भिजण्याची वेगळीच मज्जा असते. पण तुम्ही कधी उंदरांचा पाऊस पडताना पाहिला आहे का? ऑस्ट्रेलियामध्ये चक्क उंदराचा पाऊस पडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर उंदरांच्या पावसाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या उंदरांच्या पावसामागचे नेमके कारण काय ते जाणून घ्या.

का झाला उंदरांचा पाऊस?

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कसा उंदरांचा पाऊस होत आहे. एका शेतात धान्य साठवून ठेवण्यासाठी असलेले गोदाम साफ केले जात आहे. या गोदामाच्या पंपातून मेलेले आणि जिवंत उंदीर बाहेर फेकले जात आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन जर्नलिस्ट लूसी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मेलेले आणि जिवंत उंदीने जमिनीवर पडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लूसी यांनी लिहिले आहे की, गोदामात धान्य भरलेले असूनही एवढे उंदीर आतामध्ये घुसलेत.

हा व्हिडिओ पाहून एका ट्वीटर युझरने लिहिले की, ‘मी पूर्ण वर्षभरात ज्या गोष्टी पाहिल्यात, त्यापैकी हैराण करणारी ही गोष्ट आहे.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले आहे की, ‘माझ्या आयुष्यात मी कधी ऐकले नव्हते की उंदरांचा पाऊस होतो, परंतु आज मी ते पाहिले आहे.’

दरम्यान ऑस्ट्रेलियामधील शेतकरी सध्या दुष्काळाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना आशा होती की, चांगला पाऊस पडल्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारेल. परंतु उंदरांची ही दहशत पाहिल्यानंतर या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीन खालावली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आता ऑस्ट्रेलियन सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी करत आहेत.

लूसी यांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये सांगितले की, ‘एनएसडब्ल्यू सरकारने ५० मिलियन डॉलर्स माउस प्लेग पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारने हे पण सांगितले आहे की, उंदरांचा प्लेग आता फक्त एक छोटी समस्या नसून ती आर्थिक आणि सार्वजनिक आरोग्य संकटाच्या श्रेणीत आली आहे.’


हेही वाचा – Viral Video: कोरोनाबाधित ९५ वर्षांच्या आजीबाईंनी ऑक्सिजनसह बेडवर केला गरबा


 

First Published on: May 13, 2021 4:44 PM
Exit mobile version