Video: काय पो छे! लॉकडाऊनमध्ये माकडानं उडवली पतंग; इतरांचेही पतंग कापले!

Video: काय पो छे! लॉकडाऊनमध्ये माकडानं उडवली पतंग; इतरांचेही पतंग कापले!

Video: लॉकडाऊनमध्ये माकडानं उडवली पतंग; कापला इतरांच्या पतंगाचा दोर!

कोरोना व्हायरसच्या वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे देशातील लॉकडाऊची मर्यादा ३ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. यावेळी सर्वांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी टाईमपास करण्यासाठी लोकं काही न काही करताना दिसत आहेत. रस्त्यावर फिरण्यास परवानगी नसल्याने लोकं घराच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवताना दिसताय तर रस्त्यावर माणसं नसल्याने प्राणी मोकळ्या रस्त्यावर प्राणी मनसोक्त फिरताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये चक्क माकड आकाशात पतंग उडवताना दिसतोय. हा व्हिडीओ बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट सर्विसचे ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

असा आहे व्हायरल होणारा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये माकड गच्चीच्या टाकीवर आरामात बसला असून मजा घेऊन पतंग उडवताना दिसतोय. पतंगाची दोर कापल्यानंतर त्या पतंगाचा दोर त्याच्या हातात आला. यावेळी त्याने पतंग उडवायला सुरुवात केली. पतंगाचा दोर खेचत त्याने त्याची पतंग उंच उडवण्याचे प्रयत्न करताना तो दिसतोय.

या व्हिडीओला आतापर्यंत ४ हजार व्ह्यूज मिळाले तर ८०० हून अधिकांनी या व्हिडीओला लाईक केले. यासोबत २०० लोकांपेक्षा जास्त लोकांनी या ट्विटला रिट्विट केले आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.


Video : …आणि महिलेने रस्त्यावरच काढले कपडे

First Published on: April 16, 2020 4:54 PM
Exit mobile version