घरCORONA UPDATEVideo : ...आणि महिलेने रस्त्यावरच काढले कपडे

Video : …आणि महिलेने रस्त्यावरच काढले कपडे

Subscribe

भर रस्त्यात एका महिलेने अंगावरील कपडे काढून गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जवळजवळ एक महिना सर्व नागरिक बंदिस्त असल्यामुळे त्यांना आता घराबाहेर पडायचे आहे. अशीच एक महिला कोरोनाला कंटाळून लॉकडाऊनचे उल्लंघन करत रस्त्यावर आली. मात्र, ज्यावेळी पोलिसांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने अंगावरील सर्व कपडे काढण्यास सुरुवात केली. ही घटना स्पेनमध्ये घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

 

स्पेनमध्ये लॉकडाऊनबाबत अत्यंत कठोर पाऊले उचलण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील एक ४१ वर्षीय महिला लॉकडाऊनला कंटाळून घराबाहेर पडली. खरतर ही महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. मात्र, त्याचवेळी पोलिसांना पाहून ही महिला घाबरली आणि तिने आपले अंगावरचे कपडे उतरवण्यास सुरुवात केली. नंतर ही महिला एका गाडीवर उभी राहिली आणि टाळ्या वाजवू लागली. त्यामुळे एकच गोंधळ झाला. सध्या या महिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

अखेर केली अटक

त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अखेर अटक केली आणि तिला न्यायालयात नेले. मात्र, या महिलेला आता स्कत ताकिद देण्यात आली असून तिची जामिन्यावर सुटका करण्यात आली आहे.

स्पेनमध्ये दोन लाख कोरोनाबाधित

स्पेनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या १ लाख ७७ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १८ हजार ५७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यू आणि संक्रमित लोकांच्या बाबतीत स्पेन जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.


हेही वाचा – थायलंडमध्ये कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहातून पसरला कोरोनाचा विषाणू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -