अरे बापरे! डिलिव्हरीच्या ५ दिवसानंतर पुन्हा महिलेने दिला २ मुलांना जन्म

अरे बापरे! डिलिव्हरीच्या ५ दिवसानंतर पुन्हा महिलेने दिला २ मुलांना जन्म

अरे बापरे! डिलिव्हरीच्या ५ दिवसानंतर पुन्हा महिलेने दिला २ मुलांना जन्म

आपण तीन मुलांना एकत्र जन्म दिल्याचे ऐकले आहे. तसेच मागील महिन्यांत आपण एका आफ्रिकन महिलेने एकसाथ ९ मुलांना जन्म दिल्याची आश्चर्याचीबाब ऐकली आणि पाहिली आहे. पण आता एका महिलेने तीन मुलांना जन्म दिला, परंतु तिन्ही मुलांच्या डिलिव्हरीमध्ये ५ दिवसांचे अंतर होते, असल्याचे समोर आले आहे. तिन्ही मुलं सदृढ आहेत. ही महिला न्यूयॉर्कची असून डिलिव्हरीमध्ये सर्वाधिक अंतर असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

न्यूयॉर्कच्या ३३ वर्षीय कायली डेशेनने २८ डिसेंबर २०१९ला आपल्या पहिल्या मुलांला जन्म दिला. मग ५ दिवसानंतर म्हणजे २ जानेवारी २०२१ला दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. शिवाय कायलीने दोन दिवसांचा मागील रेकॉर्ड तोडून तीन मुलांना जन्म देण्याच्या सर्वाधिक अंतर रचून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. विशेष म्हणजे या मुलांची ९ टक्के जगण्याची शक्यता होती. परंतु कायलीची तिन्ही मुलं सदृढ असून ती मुलं आता १७ महिन्यांची झाली आहेत.

२८ डिसेंबर २०१९ला कायलीने पहिल्या मुलांला जन्म दिला. ही डिलिव्हरी २२व्या आठवड्यात झाली, ज्यामुळे जन्म घेणाऱ्या मुलांची वाचण्याची शक्यता कमी होती. कायलीच्या पोटात आणखी दोन मुलं होती. त्यामुळे यांची डिलिव्हरी उशीरा करण्याची डॉक्टरांची इच्छा होती. परंतु ५ दिवसांनंतर २ जानेवारी २०२० पुन्हा डिलिव्हरी झाली. कायलीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

कायलीने याबाबत सांगितले की, ‘चार वर्षांपासून ती गर्भवती राहण्यासाठी प्रयत्न करत होती. ज्यानंतर पती ब्रँडनच्या सल्ल्याने आयवीएफद्वारे गर्भधारण करण्याचा निर्णय घेतला.’ त्याने सांगितले की, ‘पहिल्यांपासून दत्तक घेतला मुलगा आणि सावत्र मुलगी होती. परंतु आम्हाला त्यांच्यासाठी आणखीन एक भाऊ पाहिजे होता. पण आम्ही एक ऐवजी दोन भ्रूण ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाल मुलं होण्याची अधिक शक्यता आहे, असे आम्हाला वाटत होते. आम्हाला जुळी मुलं होण्याची १० टक्के शक्यता होती. तर तीन मुलांची आई बनण्याची शक्यता १ टक्के होती. आम्हाला अपेक्षा नव्हती की, तीन मुलं जन्मतील. जेव्हा आम्हाला तीन मुलं झाल्याचे समजले तेव्हा आम्ही खूप हैरान होता. विश्वास बसत नव्हता.’


हेही वाचा – Viral Video: पाण्याच्या टँकमध्ये अडकून हत्तीचे पिल्लू तडफडत राहिले, सुदैवाने वाचवले प्राण


 

First Published on: May 26, 2021 11:23 PM
Exit mobile version