घरट्रेंडिंगViral Video: पाण्याच्या टँकमध्ये अडकून हत्तीचे पिल्लू तडफडत राहिले, सुदैवाने वाचवले प्राण

Viral Video: पाण्याच्या टँकमध्ये अडकून हत्तीचे पिल्लू तडफडत राहिले, सुदैवाने वाचवले प्राण

Subscribe

मागील काही दिवसांपासून हत्तींबाबत घटलेल्या अनेक घटना आपण ऐकत आहोत. कुठे हत्तीच्या तोंडात फटाके फोडण्यात आले तर कुठे वीज कोसळून अनेक हत्तींचा मृत्यू झाल्याच्या घडना पाहिल्या आहेत. यादरम्यान अनेक हत्तीचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातून कुर्ग जिल्हा येथील एका खड्यात हत्ती पडला आणि त्याला जेसीबीच्या सहाय्याने खड्डातून बाहेर काढण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले. अशाच प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हत्तीचे पिल्लू एका पाण्याच्या टँकमध्ये अडकले असून त्याला रेक्यू टीमसह अनेक जण वाचवण्याचा प्रयत्न करत होते. सध्या या हत्तीच्या पिल्लूच्या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.

भारतीय वन अधिकारी (IFS) परवीन कस्वान यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर या हत्तीच्या पिल्लूचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही पाहू शकता की, गावातील एका पाणीपुरवठा होणार्या टँकमध्ये हे हत्तीचे पिल्लू कसे वर येण्यासाठी तडपडत आहे. रेक्यू टीमने या हत्तीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. यासाठी त्यांनी पाण्याच्या टँकची आजूबाजूची भिंत पाडली. शेवटी अथक प्रयत्नानंतर हत्तीच्या पिल्लूला बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर हत्तीचे पिल्लू पुन्हा आपल्या कळपात जाण्यासाठी जंगलाच्या दिशेने रवाना झाले.

- Advertisement -

परवीन कस्वान यांनी शेअर केलेल्या या हत्तीच्या पिल्लूच्या व्हिडिओ आतापर्यंत ७३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ४ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. परवीन कस्वान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्तीला रेक्यू करताना कोणतीही इजा झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Needle Phobia : इंजेक्शनच्या सुईची भीती कशी घालवाल ?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -