Viral Video: NASA ने ५१ वर्षांपूर्वी असं केलं Apollo ११ चं प्रक्षेपण

Viral Video: NASA ने ५१ वर्षांपूर्वी असं केलं Apollo ११ चं प्रक्षेपण

नासाने जगभरात ५१ वर्षांपूर्वी १६ जुलै १९६९ रोजी अपोलो ११ (Apollo 11) चंद्रावर पाठवून इतिहास रचला होता. अपोलो ११ हे जगातील पहिले अंतराळ यान आहे ज्याने नील आर्मस्ट्राँग, बझ अ‍ॅलड्रिन आणि मायकल कोलिन्स हे तीन अंतराळवीर चंद्रावर रवाना झाले होते. या दिवसाला पुन्हा जिवंत करण्यासाठी नासाने आपल्या ट्विटर हँडलवरून अपोलो ११ प्रक्षेपण होण्याच्या क्षणाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला लोकांनी खूप पसंती देखील दिली आहे. चंद्रावर जाण्यासाठी आणि अंतराळवीरांना चंद्रावर नेण्यासाठी अपोलो ११ ला फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून सोडण्यात आले होते.

आपल्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर करताना नासाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ५१ वर्षांपूर्वी अपोलो ११ चा शुभारंभ..चार दिवसांनंतर, नील आर्मस्ट्राँग, बझ अ‍ॅलड्रिन चंद्रच्या पृष्ठभागावर उतरले, तर मायकल कोलिन्सने कमांड मॉड्यूलमध्ये ओव्हरहेडची परिक्रमा केली.

या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्स आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजर्सने ट्विटरवर अशी कमेंट केली की, “माझे आजोबा देखील अपोलो ११ अभियानाचा भाग होते.” तसेच या युजरने आपल्या आजोबांच्या वेळेचे पत्रही कमेंट बॉक्समध्ये शेअर केले आहे.

तसेच एका युजरने कमेंट केली की, माझ्याकडे टायम मशीन असती तर ती वेळ मी परत आणली असती. हा व्हिडिओ शेअर केल्यापासून चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर या व्हिडिओला १ हजाराहून अधिक रिट्वीट आणि ४ हजार लाईक्स आले आहेत.


Live Show दरम्यान न्यूज अँकरचा दात तुटून हातात! व्हिडिओ होतोय व्हायरल
First Published on: July 18, 2020 5:44 PM
Exit mobile version