सध्या सोशल मीडियावर या न्यूज अँकर चांगलेच कौतुक होत आहे.
लाइव्ह शो दरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ज्यामध्ये तांत्रिक समस्या (Technical Problem) सर्वात सामान्य असतात, मात्र युक्रेनमधील एका महिला अँकरला लाइव्ह शो दरम्यान भलत्याच समस्येला सामोरे जावे लागले, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर तिने हाताळलेली विचित्र परिस्थिती त्यांचे सध्या सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.
दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात एक युक्रेनियन अँकर मेरीचका पाडाल्को (marichka padalko) लाइव्ह शोमध्ये बातमी वाचत असतानाच तिचा एक दात तुटून चक्क तिच्या हातात येतो. अशी परिस्थिती असताना ही ती बातमी पत्र अतिशय शांतपणे सादर करत होती. यावेळी तिने तिचा दात तुटला याचे कोणालाही कळू न देता, आपले काम तिने सुरू ठेवल्याचे दिसले.
- Advertisement -
मारीचका पाडाल्कोने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर पोस्ट केला आणि त्यावर आपली प्रतिक्रिया देखील शेअर केली. तिने असे लिहिलं आहे की, गेल्या २० वर्षांपासून मी न्यूज प्रझेंटर म्हणून काम करत आहे, पण बहुधा माझा हा सर्वात विचित्र अनुभव असावा.
तिने असेही सांगितले की, या घटनेनंतर तिच्या सहकाऱ्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, जस काय तुम्ही रोजच अशी घटना हाताळता, तसेच तुम्ही ती सहजरित्या ही परिस्थिती सांभाळली. तिने असे पुढे सांगितले की, १० वर्षांपूर्वी, माझी मुलगी खेळत असताना, तिने माझ्या तोंडाकडे एक गजराचे घड्याळ फेकले ज्यामुळे माझा दात तुटला. त्यावेळी त्याच्या जागी मी दुसरा दात बसावला होता, जो बातम्या सादर करताना आता तुटून हातात आला आहे.