CoronaVirus: रामचरित मानस ग्रंथात महामारीचा उल्लेख, जाणून घ्या सत्य

CoronaVirus: रामचरित मानस ग्रंथात महामारीचा उल्लेख, जाणून घ्या सत्य

CoronaVirus: रामचरित मानस ग्रंथांत महामारीचा उल्लेख, जाणून घ्या सत्य

रामचरित मानस हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. काही हिंदू कुटुंबांकडे रामचरित मानस हा ग्रंथ असतो. या ग्रंथाचं नियमित पठण करणारे लोक फार कमी आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वी संत गोस्वामी तुलसीदास यांनी हा पवित्र ग्रंथ लिहिला. तुलसीदास यांना महर्षी वाल्मिकी यांचा अवतार मानले जाते. हा ग्रंथ तुलसीदासांनी सव्वीस दिवसात लिहून पूर्ण केला असे देखील म्हटले जाते.

सध्या कोरोना विषाणूच्या संकटात रामचरित मानस या ग्रंथामधील काही मजकुर सोशल मीडियावर तसंच काही ओळी व्हायरल होत आहे. या मजकूरात कोरोना विषाणूचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर असे म्हटले जात आहे की, ग्रंथांतील उत्तरकांडमध्ये कलियुगात वटवाघळामुळे महामारी पसरले असा दावा केला जात आहे. पण याचा अर्थ वेगळा आहे. यामध्ये सांगितले आहे की, जे लोक सर्वांची निंदा करतील ते वटवाघुळ म्हणून जन्माला येतील. त्यानंतर काळात मनुष्यात रोगाचा प्रसार होईल, असा यामध्ये सुतोवाच केला आहे.

या ग्रंथात कुठेही कलियुगात वटवाघळामुळे महामारी पसरले असा उल्लेख केला नसून मनुष्य कोणत्या कर्मामुळे वटवाघुळ म्हणून जन्माला येईल हे सांगितले आहे. याशिवाय रामचरित मानस ग्रंथातील एका पानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

 


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनाची लस टोचून घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मृत्यू, जाणून घ्या सत्य


 

First Published on: May 6, 2020 5:00 PM
Exit mobile version