CoronaVirus: कोरोनाची लस टोचून घेणाऱ्या पहिल्या महिलेचा मृत्यू, जाणून घ्या सत्य

लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर अफवांना उधाण आलं आहे. दरम्यान पहिल्यांदा लस टोचून घेणाऱ्या महिलेच्या मृत्यूची अफवा देखील सोशल मीडियावर जबरदस्त पसरत आहे.

First woman on vaccine trial 'doing fine' following vile rumours she had died

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक देशांमध्ये प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान सोशल मीडियावर अफवांना उधाण आलं आहे. ब्रिटनमधील पहिल्यांदा कोरोना लसीची चाचणी केलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची अफावा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मात्र ही अफवा खोटी असून लस टोचल्यानंतर या महिलेची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावर लस विकसित करून त्या लसीची पहिल्यांदा चाचणी एका सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ महिलेवर करण्यात आली होती. या अफवाबाबत ब्रिटन सरकारने सांगितलं की, सोशल मीडियावर या महिलेच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्यात आली आहे. सुरुवातील ज्या दोन जणांवर ही लस टोचण्यात आली होती. त्यात या महिलेचा समावेश होता.

या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ महिलेचे नाव डॉ. एलिसा ग्रॅनॅटो असे असून त्यांना गुरुवारी ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस त्यांना टोचण्यात आली होती. मात्र तिचा लगेचच मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर ग्रॅनॅटो यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट लिहिलं आहे की, स्वतःच्या मृत्यूबद्दल खोटी बातमी वाचणे याहून दुसरे काही गमतीदार नाही. मी प्रत्यक्षात ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने दावा केला होता की, सप्टेंबरपर्यंत कोरोनाची लस तयार होईल. मोठ्या प्रमाणात लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. जगातील विविध भागात सात उत्पादकांसह उत्पादन केलं जात आहे, असल्याचं म्हटलं होत. मात्र ब्रिटनच्या एका मंत्र्यानं असं विधान केलं आहे की, यावर्षाच्या अखेरस आमच्याकडे कोरोनावर मात करणारी लस उपलब्ध होणे शक्य नाही. आतापर्यंत ब्रिटनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांहून अधिक असून मृतांचा आकडा २१ हजार पार झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: कोरोनावरील उपाय करण्याबाबत WHOने युरोपियन देशांना केले आवाहन