Video : भररस्त्यात हत्तींच्या कळपाबरोबर घ्यायला गेले सेल्फी, आणि….

Video : भररस्त्यात हत्तींच्या कळपाबरोबर घ्यायला गेले सेल्फी, आणि….

हत्ती हा खूप शांतप्रिय पाणी आहे. मात्र जेव्हा कोणी त्याची मुद्दाम खोड काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यापेक्षा धोकादायक कोणी नसते. पण कधी कधी हत्ती हा माणसांपेक्षा अतिशय समजूतदार असल्यासारखा वागतो. विश्वास नसेल तर या बातमीमधील व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी 6 ऑगस्ट रोजी शेअर केला आहे. ज्यात म्हटले की, वन्यजीवांसोबत सेल्फीचा क्रेझ घातक ठरु शकते. मात्र हे लोक भाग्यवान होते ज्यांना या महाकाय हत्तींनी त्यांच्या कृत्यानंतरही माफ केले. नाहीतर… बलाढ्य हत्तींना लोकांना धडा शिकवायला वेळ लागणार नाही.

स्वॅगमध्ये घेत होते हत्तीसोबत सेल्फी

ही व्हिडीओ अगदी 56 सेंकदाचा आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावर हत्तींचा कळप पाहून कार चालक कार मागे वळतो. यावेळी कारमधील तरुणं हत्तींपासून दूर उभं राहून सेल्फी घेण्याऐवजी हत्तींच्या अगदी जवळ उभे राहून सेल्फी काढू लागतात. त्यानंतर एक तरुण रस्त्याच्या अगदी मधे उभा राहतो आणि त्याच्या एका मित्राला सेल्फी घेण्यास सांगतो. आणि हो, तो फोटोसाठी स्वॅगसह पोजही देतो. सेल्फी घेतल्यानंतर दोघेही रस्त्यावर उभे राहतात. लोकांची गर्दी आणि त्यांच्या हालचाल पाहून हत्ती अचानक त्यांच्या दिशेने धावतात. यावेळी लोक स्वतःला वाचवण्यासाठी धावतात. पण हत्ती कुणालाही इजा न करता जंगलात जातात.

‘त्यांच्यापेक्षा हत्ती जास्त समजूतदार’

या व्हिडिओला आतापर्यंत 67 हजार व्ह्यूज आणि 2 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी या तरुणांना मूर्ख म्हणत हत्तींना समजुतदार असल्याचे म्हटले आहे.

त्याच वेळी, काही युजर्सनी असेही म्हटले की, अनेक लोक सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट पोस्ट करून लाईक्स आणि व्ह्यूज मिळविण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालतानाही मागे हटत नाहीत. तर एका युजरने म्हटले की, मॅडम हा व्हिडिओ जुना दिसत आहे. चार महिन्यांपूर्वीची ही घटना आहे! हे संपूर्ण दृश्य पाहिल्यानंतर तुमचे मत काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा.


केंद्राकडून महाराष्ट्राला मोठा निधी मिळणार; नीती आयोगाच्या बैठकीबाबत एकनाथ शिंदेंची माहिती

First Published on: August 8, 2022 3:15 PM
Exit mobile version