सावधान! ‘या’ एका सवयीमुळे होतोय लवकर मृत्यू; आताच व्हा सतर्क

सावधान! ‘या’ एका सवयीमुळे होतोय लवकर मृत्यू; आताच व्हा सतर्क

प्रातिनिधीक फोटो

अन्न, पाणी आणि निवारा याप्रमाणेच मानसाला झोपं देखील मानवाच्या जीवनासाठी महत्वाची आहेत. तज्ज्ञांच्या मते, दररोज पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. मात्र आता यासंदर्भात एक भयानक स्टडी समोर आला आहे. मिळालेल्या एका नवीन अहवालानुसार ज्या लोकांना रात्री झोपेची समस्या किंवा कमी झोपेची समस्या उद्भवते त्यांना डिमेंशिया नावाचा आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. इतकेच नव्हे तर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अशी अनेक कारणे देखील उद्भवू शकतात ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला देखील कमी झोपेची सवय आहे का? असेल तर सतर्क रहा…

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मेडिसिन इंस्ट्रक्टर रेबेका रॉबिन्सन यांच्या मते, ‘या स्टडीमधून समोर आलेल्या पुराव्यांवरून असे दिसते की, प्रत्येक दिवशी रात्रीची झोप आपल्या आयुष्यासाठी किती महत्त्वाची असते. हे केवळ आपल्या न्यूरोलॉजिकल सिस्टीमसाठीच फायदेशीर ठरत नाही तर मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी देखील हे प्रभावी असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसह जगभरातील लोकांमध्ये झोपेचे वेड, डेमेंशिया किंवा इतर काही कारणामुळे लवकर मृत्यू संदर्भातील संबंध ही चिंतेची बाब आहे. ‘वर्ल्ड स्लीप सोसायटी’ च्या मते, जगातील ४५ टक्के लोकांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप ही धोकादायक ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे मनुष्याला दररोज रात्री किमान ७ ते १० तासांची झोप पाहिजे. यासह यूएस रोग आणि नियंत्रण प्रतिबंधक केंद्राच्या मते, अमेरिकेतील प्रत्येक तिसरा माणूस झोपेच्या या पद्धतीचा अवलंब करण्यास सक्षम ठरत नसल्याचे समोर येत आहे. अहवालानुसार अमेरिकेत, साधारण ५ ते ७ कोटी लोक स्लीप डिसॉर्डर, स्लीप एपनिया, निद्रानाश आणि अस्वस्थ,रेस्टलेस लेग सिंड्रोम सारख्या आजारांनी ग्रस्त आहेत. सीडीसी यास एक ‘सार्वजनिक आरोग्य समस्या’ असे सांगतात की, कारण झोपेचा हा विकार देखील मधुमेह, स्ट्रोक, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्मृतिभ्रंश यांच्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे तुम्ही किती वेळ शांत झोपतात याला देखील तितकेच महत्व आहे.

अभ्यासामध्ये, झोपेच्या समस्या नोंदविलेल्या सहभागींच्या अहवालांचा संबंध प्रत्येक सहभागीच्या वैद्यकीय नोंदीशी जोडला गेला आहे. अभ्यासानुसार असे समोर आले की, प्रत्येक रात्री झोपेसंबंधी समस्या अनुभवणार्‍या ४४ टक्के लोकांना एकाधिक कारणांमुळे मृत्यूचा धोका असतो. तर बहुतेक रात्री या समस्येचा त्रास असलेल्या ५६ टक्के लोकांना लवकर मृत्यूचा धोका असण्याचा संभव आहे.


Covid-19: आता मोबाइल फोनद्वारे करता येणार कोरोना संसर्गाची तपासणी; वाचा सविस्तर

First Published on: June 24, 2021 10:57 PM
Exit mobile version