ड्युटी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला कॉल कराल तर बॉसला होईल शिक्षा

ड्युटी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला कॉल कराल तर बॉसला होईल शिक्षा

ड्युटी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला कॉल कराल तर बॉसला होईल शिक्षा

आजकाल अनेक प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कामाचे प्रचंड प्रेशर आहे. कंपनीतील कर्मचारी प्रचंड ताणात काम करत असतात. अनेक कंपन्यांमध्ये फार फ्रेंडली वातावरण पहायला मिळते मात्र बऱ्याच कंपन्यांमध्ये कार्यालयीत वेळ संपल्यानंतर किंवा सुरू होण्याच्या आधीपासूनच कर्मचाऱ्यांवर कामाचे प्रेशर आणला जाते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर मोठा परिणाम होतो. मात्र आता जो बॉस आपल्या कर्मचाऱ्याला कार्यालयीन वेळ सुरू होण्याआधी किंवा संपल्यानंतर फोन करेल किंवा काम करण्याची मागणी करेल त्या बॉसला शिक्षा करण्यात येईल, असा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भारत सरकारचा नसून पोर्तुगाल सरकारचा असून पोर्तुगाल कामगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्री एना मेंडिस गोडिन्हो यांनी लिस्बन येथे ही घोषणा केली आहे.

पोर्लुगाल सरकारने घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम हा कामाचा नवा पर्याय सर्वासमोर आहे. मात्र याचा अर्थ कर्माचाऱ्यांनी घरी राहून दिवसभर केवळ कामच करायचे असा नाही. अशा परिस्थितीत काम शक्य तितके सोपे करणे आवश्यक आहे.

पोर्लुगाल सरकारने हा निर्णय घेण्याआधी एक अहवाल सादर केला आहे त्यात असे म्हटले आहे की, अनेक कंपन्यांमध्ये बॉस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात. कामाचे तास संपल्यानंतर त्यांना कॉल, मेसेज करुन कामाचे प्रेशर आणतात. कर्मचारी सतत तणावात असल्याने याचा त्यांच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.

पोर्तुलाग सरकारने कंपन्यांना दिल्या सूचना

First Published on: November 10, 2021 6:43 PM
Exit mobile version