घरट्रेंडिंगकायपण, हा तरुण विकतोय ओरियो बिस्किटांची भजी

कायपण, हा तरुण विकतोय ओरियो बिस्किटांची भजी

Subscribe

केवळ २० रुपयांना १०० ग्रॅम ओरिओ बिस्किटांची भजी

छान थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीत मस्त चमचमीत खाण्याचं मन होत असतं. चमचमीत खायचं असेल पहिला पदार्थ डोळ्यांसमोर येतो म्हणजे मस्त कुरकुरीत गरमा गरम भजी. आतापर्यंत आपण वेगळवेगळ्या प्रकारच्या भजी पाहिल्यात आणि खाल्ल्यात देखील. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका भजीने सगळ्यांच्या तोडांचे पाणी पळवलयं. सध्या भजीचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होतोय. त्या भजीची नावं ऐकून तुम्हीही म्हणाल हे काय? काय पण? सोशल मीडियावर एका भजीची रेसिपी व्हायरल होतेय ती म्हणजे ओरिओ बिस्किटची भजी. या भजीला काय म्हणावे आणि काय नाही असे नेटकऱ्यांना झाले आहे.

अहमदाबादमध्ये एका स्ट्रिट फूट स्टॉलवर ओरिओ बिस्टिकांची भजी विकणाऱ्या दुकानदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो ओरिओ बिस्किटांची भजी विकताना दिसतोय. व्लॉगर अमर सिरोही या यूट्यूबरने या ओरिओ बिस्किटांच्या भजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. स्ट्रिट फूड विक्रेता बेसनमध्ये मिठ टाकून त्यात ओरिओ बिस्किट घोळवून गरम तेलात टाकून त्याची गरमागरम भजी तळताना दिसतोय.

- Advertisement -

ही आगळी वेगळी ओरिओ बिस्किटांची भजी पाहून नेटकऱ्यांनी धम्माल उडवली आहे. व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट पहायला मिळत आहेत. केवळ २० रुपयांना १०० ग्रॅम ओरिओ बिस्किटांची भजी विकणाऱ्याला पाहून लोकांनी त्यांची पूर्ती खिल्ली उडवली आहे. विचित्र प्रकाराची ही भजी लोकांमध्ये इतकी फेमस का आहे? भजी चवीला फार छान आहे पण ती माझ्यासाठी बनलेली नाही, अशी प्रतिक्रिया व्लॉगर अमर सिरोही याने दिली आहे.

व्लॉगर अमर सिरोही देशातील अनेक ठिकाणी,लहान लहान भागातील खाद्यसंस्कृती तिथली स्पेशल आणि फेसम डिश ट्राय करत असतो. प्रत्येक पदार्थाचा प्रामाणिक फिड बॅकही अमर सिरोही नेहमी देत असतो. अमर सिरोहीने अनेकदा विचित्र डिश देखील खाल्ल्या आहेत. त्याचे प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

- Advertisement -

हेही वाचा – २४ वर्षांच्या तरुणीला तिशीच्या आत १००० पुरुषांशी ठेवायचे आहेत संबंध

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -