‘हे’ आहेत आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचे अध्यात्मिक गुरू

‘हे’ आहेत आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचे अध्यात्मिक गुरू

'हे' आहेत आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचे अध्यात्मिक गुरू

मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  हे देशातील सर्वात मोठे बिझनेसमन म्हणून ओळखले जातात. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी यांची ओळख आहे. अंबानी कुटुंबात देवाला फार महत्त्व आहे. अंबानी परिवाराचे एक आध्यात्मिक गुरु आहेत. रमेश भाई ओझा (Ramesh Bhai Ojha )असे मुकेश अंबानी यांच्या आध्यात्मिक गुरुंचे नाव आहे.  वडिलांच्या मृत्यूनंतर मुकेश अंबानी आणि त्याचे भाऊ अनिल अंबानी यांनी ओझा यांना आपले आध्यात्मक गुरु मानले आहे. कोण आहेत गुरु ओझा? ते काय करतात? जाणून घ्या. (Ramesh Bhai Ojha is spiritual guru of Mukesh Ambani)

 

रमेश भाई ओझा यांचा जन्म एका ब्राम्हण कुटुंबात झालाय. ते गुजरात येथे राहतात. त्यांची आजी भागवत पुराणाला खूप महत्त्व देत होती. संपूर्ण घरात भागवत कथा वाचली जावी अशी त्यांची फार इच्छा होती. त्यामुळे आपल्या आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी रमेश ओझा आपल्या घरात भागवत कथेचे वाचन करायचे. रमेश ओझा जेव्हा आईच्या पोटात होते तेव्हा पासूनच भागवत कथा ऐकत होते,असे त्यांच्या आईने त्यांना सांगितले. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आध्यात्म जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ते प्रसिद्ध आध्यात्म गुरु झाले.

धीरूभाई अंबानी याच्या पत्नी कोकिलाबेन या ओझा यांचे कार्यक्रम पाहायच्या. एक दिवस त्यांनी ओझा यांना आपल्या घरी भागवत कथा वाचण्यासाठी बोलावले. आठवडाभर सुरु असलेल्या भागवत पाठानंतर धीरुभाई अंबानी त्यांचे मुरीद झाले आणि त्यांनी ओझा यांना अंबानी परिवाराच्या प्रत्येक धार्मिक प्रतिष्ठानाची जबाबदारी ओझा यांच्यावर दिली.


हेही वाचा – सालेरी किल्ल्याची उंची पाहू गेले असता पागोटे गळून पडते

 

 

First Published on: July 9, 2021 6:44 PM
Exit mobile version