अरे व्वा! ‘इथं’ मिळतंय फ्रीमध्ये पेट्रोल पण ‘हे’ करावं लागणार

अरे व्वा! ‘इथं’ मिळतंय फ्रीमध्ये पेट्रोल पण ‘हे’ करावं लागणार

अरे व्वा! 'इथं' मिळतंय फ्रीमध्ये पेट्रोल पण 'हे' करावं लागणार

देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनला भिडत आहेत. त्यामुळे लोकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे. पण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे लोकं सध्या वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. तसेच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक जण पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे समोर येत आहे. पण दुसऱ्याबाजूला भारतातील एका पेट्रोल पंपावर १ लीटर पेट्रोल मोफत दिलं जात आहे. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे.

इथं मिळतंय मोफत पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीच्या वाढीदरम्यान दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील एका पेट्रोल पंप मालकानं पेट्रोल मोफत देण्याची जबरदस्त ऑफर आणली आहे. तामिळनाडूच्या नागापमल्ली मधील पेट्रोल पंपवर मोफत पेट्रोल दिलं जात आहे. पण यासाठी ग्राहकांच्या मुलांना श्लोक पाठ असणं गरजेचं आहे. जर ग्राहकांच्या मुलांना तिरुक्कुरलचे २० श्लोक येत असतील तर १ लीटर पेट्रोल मोफत दिलं जाईल आणि १० श्लोक येत असतील तर अर्धा लीटर पेट्रोल मोफत दिलं जाईल.

मोफत पेट्रोल देण्यामागचा नेमका उद्देश

तिरुवल्लवुर दिवसांच्या निमित्ताने गेल्या महिन्यापासून तामिळनाडूच्या या पेट्रोल पंपवर ही ऑफर सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही ऑफर सुरू राहणार आहे. ही ऑफर पहिली ते अकरावी इयत्तेतील मुलांसाठी आहे. मुलं आपल्या आई-वडिलांसह पेट्रोल पंपावर येऊन तिथे २० किंवा १० श्लोक म्हणून पेट्रोल मोफत घेऊ शकतात. विशेष म्हणजे या ऑफरचा फायदा अनेकदा घेऊ शकतात. त्यासाठी फक्त श्लोक पाठ असणे गरजेचं आहे. ही अनोखी कल्पना या पेट्रोल पंपचे मालक आणि वल्लुवर कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनजमेंजच्या अध्यक्षा के सेनगुट्टुवन यांची आहे. दरम्यान मुलांचा तिरुक्कुरल वाचण्यासाठी आणि श्लोक पाठांतरासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही ऑफर ठेवण्यात आली. गुरुवारी या स्पर्धेमध्ये १४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.


हेही वाचा – बापरे! घरात घुसून ८ दिवसांच्या जुळ्या मुलीना माकडाने नेलं घराच्या छतावर अन्…


 

First Published on: February 15, 2021 7:44 PM
Exit mobile version