Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग बापरे! घरात घुसून ८ दिवसांच्या जुळ्या मुलीना माकडाने नेलं घराच्या छतावर अन्...

बापरे! घरात घुसून ८ दिवसांच्या जुळ्या मुलीना माकडाने नेलं घराच्या छतावर अन्…

Related Story

- Advertisement -

तामिळनाडूतील तंजावूर येथे एका आठ दिवसांच्या चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माकडांची टोळी एका घरात शिरली आणि त्या घरातील जुळ्या मुलांनी चक्क उचलून घराच्या छतावर घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर बऱ्याच प्रयत्नांनी एका मुलीला घऱाच्या छतावरून वाचविण्यात आले यश आले पण दुसऱ्या मुलीचा या घटनेत मृत्यू झाला.

असा घडला प्रकार

बुवनेश्वरी नावाच्या महिलेने ८ दिवसांपूर्वी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. बुवनेश्वरीच्या मुलीच्या मृत्यूनंतर तिची अवस्था अत्यंत दु: खी, दयनीय झाली. शनिवारी सकाळी त्यांची दोन्ही मुलं घरातच झोपली होती असे बुवनेश्वरीने सांगितले. यावेळीच काही माकडांच्या गटाने घराच्या छतावरील कौलं काढून घरात प्रवेश केला आणि या जुळ्या मुलींना उचलून घेऊन गेले. या घटनेच्या दिवशी बुवनेश्वरी घरचे कामं करून परतली तेव्हा छतावरील माकडांना पाहून तिला धक्का बसला आणि मदतीसाठी तिने आरडा ओरडा सुरू केला.

- Advertisement -

मात्र काहीवेळाने या महिलेच्या लक्षात आले की, तिच्या दोन्ही जुळ्या मुली घरातून बेपत्ता आहेत आणि एका मुलीला घराच्या छतावर पाहिले, पण दुसरी मुलगी कुठेही दिसत नसल्याने या महिलेचा जीव कासावीस झाला. हे पाहून ती मोठ्याने रडू लागली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी मदत करण्यासाठी धाव घेतली. मात्र यावेळी लक्षात आले की घरात काही माकडांनी शिरकाव केला आणि तिच्या जुळ्या चिमुकल्या मुलींना घराच्या छतावर नेले. शोध घेतल्यानंतर एका मुलीला घराच्या छतावरून वाचविण्यात आले, मात्र दुसरी मुलीचा शोध लागला नाही. थोड्या वेळाने, घराजवळच असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ दुसर्‍या मुलीचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. यानंतर वैद्यकीय पथकाने त्वरीत मुलीची तपासणी केली पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला.

- Advertisement -