वैज्ञानिकांनी शोधला दुर्मिळ Baby Ghost Shark, काय आहे वैशिष्ट्य ?

वैज्ञानिकांनी शोधला दुर्मिळ Baby Ghost Shark, काय आहे वैशिष्ट्य ?

Scientists discovered rare baby ghost shark in New Zealand

Baby Ghost Shark : समुद्रात असलेल्या शार्क विषयी आजवर सर्वांनाच आकर्षण वाटत आलं आहे. पण शास्रज्ञांनी एक बेबी घोस्ट शार्क,म्हणजेच शार्क भुताचे पिल्लू शोधून काढले आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, न्यूझीलँडच्या वैज्ञानिकांनी समुद्राच्या तळाशी जाऊन  बेबी घोस्ट शार्क या छोट्या माशाच्या प्रजातीचा शोध घेतला आहे. न्यूझीलँडच्या दक्षिण द्विपच्या पूर्व तटापासून १.२ किलोमीटर खोल पाण्यात हा बेबी घोस्ट शार्क दिसून आला आहे. माशाच्या या प्रजातीला चिमेरा असे म्हणतात. ही प्रजाती फार दुर्मिळ असून समुद्र तळाशी ठेवलेल्या अंड्यांमध्ये त्या बाहेर येतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड एटमॉस्फेरिक रिसर्चमध्ये मत्स्य वैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या डॉ. फिनुची यांनी या माशाचा खोलात जाऊन अभ्यास केला. ते म्हणाले या माशाचा शोध एका दुर्घटनेमुळे झाला. बेबी घोस्ट शार्क हे सामान्य: समुद्र तळाशी असलेल्या अंड्याच्या कॅप्सूलमधून बाहेर येतात.

फिचुनी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, समुद्राच्या खोल पाण्यात या माशांच्या प्रजाती पाहायला मिळणे फार दुर्मिळ आहे. त्यातही घोस्ट शार्क पाहायला मिळणे ही फार गुढ बाब आहे. काही दिवसांआधीच कॅप्सूल अंड्यांनी भरलेले होतो आणि त्यामुळेच काही दिवसांआधी एक बेबी घोस्ट शार्क बाहेर आले आहे. समुद्र जीवविज्ञानी केल्या अनेक वर्षांपासून या घोस्ट शार्कचा अभ्यास करत आहेत. त्यांचे व्यवहार, खाण्याची पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बेबी घोस्ट शार्क हे निवाऱ्यासाठी फार वेग वेगळ्या ठिकाणांवर जातात आणि वेगवेगळा आहात त्या सतत खाऊ शकतात.

फिनुची यांची सांगितले की, बेबी घोस्ट शार्कला समजून घेण्यासाठी त्यांची टीम शार्कचे काही नमुने गोळा करणार आहे. त्यानुसार बेबी घोस्ट शार्कच्या संपूर्ण शरीराचे आम्हाला मोजमाप करता येईल.

भूत शार्क नेमकं आहे काय ?

हा प्राणी शार्क आणि किरणांचा एक समान कार्टिलाजीनस जीव आहे. त्यांच्यात असलेल्या कार्टिलाजीनस त्यांना भयानक आणि अलौकिक बनवतात. भूत शार्क हे प्रामुख्याने समुद्र तळाशी मोलस्क आणि किडे खातात. एक वयस्कर भूत शार्क जवळपास २ मीटर लांब असू शकतो आणि हे शार्क संपूर्ण जगात आढळतात. यातील काही मासे उथळ किनारपट्टीच्या भागात पाहायला मिळतात.


हेही वाचा – Video: रोजंदारीवर काम करणाऱ्या ६० वर्षीय मजुराचा इन्स्टाग्रामवर धुमाकूळ 

First Published on: February 17, 2022 8:04 AM
Exit mobile version