जत्रेतील पाळण्यात बसत असाल तर ‘हा’ व्हिडिओ जरुर पाहा

जत्रेतील पाळण्यात बसत असाल तर ‘हा’ व्हिडिओ जरुर पाहा

जत्रेतील पाळण्यात बसत असाल तर 'हा' व्हिडिओ जरुर पाहा

आपण नेहमी जत्रेत किंवा फेस्टिव्हलमध्ये मज्जा करण्यासाठी मोठ मोठ्या राइटमध्ये बसतो. अनेकदा काही लोकांना त्यामध्ये बसल्यावर चक्कर येण्यासारखे प्रकार घडतात. मात्र थायलंडमधील कार्निव्हलमधील अम्यूझमेंट राइड दरम्यान हा झालेला अपघात पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. या अम्यूझमेंट राइड दरम्यान स्विंगमुळे काही लोक अचानक सीटवरून खाली पडले. या सर्व घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीजीटीएनने हा एक मिनिटांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या राइटची मज्जा घेत असलेल्या मधील पाच जणं वरून खाली येत असताना अचानक खाली पडले. त्यामुळे सगळे घाबरले. हे पाचही जणं स्टीलच्या प्लेटफॉर्मवर पडले. सेफ्टी बेल्ट सैल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. सीजीटीएनच्या वृत्तानुसार, अपघातानंतर ऑपरेटरने त्वरित मशीन बंद केली.

सर्व खालील पडलेले लोक उठून चटकन त्या राइटपासून दूर गेले. या अपघातात एका मुलाच्या डोक्याला दुखापत झाली. तो रडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान या अपघातानंतर ऑपरेटरने सर्वांची माफी मागितली. ते म्हणाले, ‘कंट्रोल सेंटर हे माझ्याकडे होत. माझ्यासोबत माझा आणखीन एक मित्र होता जो ब्रेक वर गेला होता. मी जखमी झालेल्याची माफी मागतो. जे झालं ते घडलं नाही पाहिजे होत.’ त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश दिला की, ही राइड तात्पुरती बंद करावी लागेल आणि मालकाचा परवाना तपास केला जाईल.


हेही वाचा – Video: संसदेत खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज


 

First Published on: December 4, 2019 5:35 PM
Exit mobile version