Video: संसदेत खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

खासदाराने केलेले प्रपोज आणि त्याचा अनोखा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

संसदेत खासदारानं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज

संसदेत आपण नेहमी कोणत्या न कोणत्या मुद्द्यांवर वाद-विवाद होताना बघितले आहे. तसेच पक्ष आणि विरोधी पक्षातील मंडळींची चर्चा त्यातून होणारे वाद हे आपल्यासाठी काही नवीन नाही. मात्र इटलीच्या संसदेत अशी काही घटना घडली की त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. संसदेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान चक्क एका खासदाराने आपल्या गर्लफ्रेंडला अनोख्या स्टाईलमध्ये प्रपोज केल्याचे समोर आले आहे. नुसते प्रपोज नाही तर लग्न करण्याचा प्रस्ताव देखील त्याने त्याच्या गर्लफ्रेंड समोर मांडला आहे.

अर्थमंत्री फ्लॅविया डी मुरो (Flavio Di Muro) हे भूकंपावर आपले भाषण देत होते, त्यावेळी अचानक त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडसमोर अंगठी काढत लग्नासाठी विचारणा केली. यावेळी संसदेत सर्व उपस्थित असलेल्या सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. संसदेतील भाषणादरम्यान आपण तेथील खासदारांना डुलक्या घेताना तसेच आपल्याच फोनमध्ये दंग असल्याचे बऱ्याचदा पाहिले आहे. पण प्रपोज केल्याचा हा किस्सा पहिलाच असावा. मात्र इतकेच नाही तर त्यांच्या गर्लफ्रेंडनेही लग्नासाठी त्याला होकार दिला. त्यानंतर सर्वच खासदारांनी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

खासदाराचा व्हिडिओ होतोय व्हायरल

फ्लेवियो डी मुरो असे या खासदाराचे नाव असून संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. या घटनेनंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदाराने केलेले प्रपोज आणि त्याचा अनोखा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.


इन्स्टाग्रामवरील २४ लाख फॉलोअर्स असलेल्या मांजरीचा मृत्यू