Thank you coronavirus helpers: Google ने Doodle मधून मानले आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिकांचे आभार

Thank you coronavirus helpers: Google ने Doodle मधून मानले आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिकांचे आभार

Thank you coronavirus helpers: Google ने Doodle मधून मानले आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिकांचे आभार

देशात कोरोनाच्या कठीण काळात सर्वांसाठी देवाच्या रुपात धावून आलेले देशाचे कोरोना योद्धा. त्यांच्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात सर्व आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरु आहे. याच कोरोना योद्धांचे आभार मानण्यासाठी गुगलने एख खास डुडल तयार केले आहे. गुगल नेहमीच जगातील सर्वांत महत्त्वाच्या प्रसंगाचे डुडलच्या माध्यमातून चित्रण करत असते. कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या सार्वजनिक आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस,आरोग्य सेवक, त्याचबरोबर वैज्ञानिकांचेही गुगलने डुडलच्या माध्यामातून आभार मानले आहे. डॉक्टर नर्सेस यांना आपण कोविड योद्धा म्हणून संबोधतो. मात्र देशात कोरोना प्रतिबंध लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक वैज्ञानिक अहोरात्र झटत होते. त्यांच्या कार्यालाही गुगल धन्यवाद दिले आहेत.


या एनिमेटेट डुडलमध्ये एक वैज्ञानिक दिसत आहे. जी काम करत आहे. गुगलवर क्लिक केल्यानंतर Thank you Coronavirus helpers असा मेसेज समोर येतो. G या अक्षराला पाय दाखवण्यात आले आहेत. तर G त्याचे प्रेम E पाठवत आहे. Eच्या भोवताली डॉक्टर,वैज्ञानिक, आरोग्य कर्मचारी दाखवण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीही गुगलने अशाप्रकारचे डुडल तयार करुन कोरोना योद्धांचे आभार मानले होते. कोरोना महामारीच्या काळाचही गुगल अनेक महत्त्वाची आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे. सोशल मीडियावरुन अनेक जण लोक कोरोनाविषयी जनजागृती करत आहेत. देशात लसीकरण सुरु आहे. मात्र तरीही  देशात कोरोनाची परिस्थिती आणखीच ढासळत चालली आहे. देशात रोज ३ लाखांहू अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.


हेही वाचा – गुगलने आणलंय खास टूल! लॉकडाऊनमध्येही घरात बसुनच करता येईल जगाची सफर

 

 

First Published on: April 26, 2021 11:57 AM
Exit mobile version