घरटेक-वेकगुगलने आणलंय खास टूल! लॉकडाऊनमध्येही घरात बसुनच करता येईल जगाची सफर

गुगलने आणलंय खास टूल! लॉकडाऊनमध्येही घरात बसुनच करता येईल जगाची सफर

Subscribe

घरबसल्या करा जगाची सफर

देशात कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाऊन लावण्यात आलाय. त्यामुळे घराबाहेर पडणे देखिल मुश्किल झाले आहे. पर्यटनासाठी कुठेही बाहेर जाता येत नाहीय. त्याचप्रमाणे देशभरातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटनासाठी बंद करण्यात आली आहे. मग आता घरी बसूनही कंटाळा येतो. बाहेर जाणे नाही, फिरणे नाही. यावर आता गुगलने एक भन्नाट कल्पना लढवली आहे. त्यामुळे आपल्याला घरबसल्या केवळ देशाचीच नाही तर जगातील पर्यटनस्थळांची सफर करण्याची संधी मिळणार आहे. अमेरिकन सर्च जायंट गुगलने एक असे टूल तयार केले आहे ज्यामुळे युझर्स प्रसिद्ध ताजमहाल त्याचप्रमाणे देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची सफर करु शकणार आहेत.

जागतिक वरसा दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र शिक्षण,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेने गुगलसोबत पार्टनरशीप करुन १० युनिस्कोच्या हेरिटेज साइट्ससाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे. Google Arts And Culture या साइटवर जाऊन जगभरातील जागतिक वारसा असलेल्या सर्व हेरिटेजची व्हर्च्युअल सफारी करता येणार आहे. गुगलने तयार केलेल्या या मायक्रोवेबसाईटवर जगातील प्रसिद्ध अशा ताजमहालची व्हर्च्युअल सैर करता येईल. त्याचप्रमाणे सेरेनगेटी नॅशलन पार्क, कोलोसीयम आणि योसेमाइट नॅशलन पार्क देखिल पाहता येणार आहे.

- Advertisement -

मायक्रोसाईटच्या होम पेजवर गेल्यावर आपल्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ताजमहालाच्या इतिहासाची माहिती मिळेल. पुरातत्व वास्तूंविषयी अभ्यास करणाऱ्यांसाठी ही साइट उपयोगी पडू शकते. गेल्या वर्षभरापासून सांस्कृतिक पर्यटनाला ४० टक्के फटका बसला आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पर्यटनही ७५ टक्के खाली घसरले आहे


हेही वाचा – Proning: कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडचण? कमी होतेय ऑक्सिजन पातळी?; आरोग्य मंत्रालयाने सुचविले घरगुती उपचार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -