Sunday, May 5, 2024
घरमानिनीFashionटक्कल करण्याचा महिलांमध्येही ट्रेण्ड, हे आहे कारण

टक्कल करण्याचा महिलांमध्येही ट्रेण्ड, हे आहे कारण

Subscribe

केवळ पुरुषच नाही तर महिलाही केशवपण (टक्कल) करतात. केसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती तर मिळतेच, पण उन्हाळ्यात थंड राहण्याचा मार्गही आहे. आज काल महिलांमध्ये देखील केस कापण्याची किंवा केशवपण (टक्कल) करण्याची स्टाइल आलेली आहे. (Bald hair style) अनेक महिला स्वत:च्या आरोग्यासाठी देखील करतात पण काही महिला फॅशन म्हणून देखील करतात.

केसांची वाढ चांगली होते

लहान मुलांची टक्कल केल्याने केसांची वाढ चांगली होते असे मानले जाते. केस जन्मतःच खूप मऊ असतात. जन्मानंतर काही महिन्यांनी त्याची जागा टर्मिनल केसांनी म्हणजेच मोठ्या केसांनी घेतली जाते. केसांची रचना, मऊ चमकदार केस पूर्णपणे जीन्स आणि वातावरणावर अवलंबून असतात. त्यामुळे टक्कल केल्यानंतर केसांची वाढ चांगली होण्याची शक्यता नाही.

- Advertisement -

टाळू निरोगी होतो

जेव्हा डोके केसांनी भरलेले असते तेव्हा टाळू स्वच्छ ठेवणे सोपे नसते. केस त्वचा आणि बाह्य जगामध्ये अडथळा म्हणून काम करतात. त्यामुळे टाळूवर घाण आणि बॅक्टेरिया अडकतात. परिणामी, टाळू कालांतराने गलिच्छ आणि अस्वस्थ होते. केस सातत्याने कापल्याने टाळू स्वच्छ राहते.

दिसायला कूल आणि मस्त लुक वाटतो

जर तुम्हाला उन्हाळ्यात मस्त दिसायचे असेल, तर तुम्ही तुमचे केस कापण्याचा नक्कीच विचार करा. आपले केस कापण्यापेक्षा स्वत: ला व्यक्त करण्याचा दुसरा चांगला मार्ग नाही. केसांच्या गर्दीतून बाहेर पडण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. केस कापल्याने डोके थंड वाटू शकते. टक्कल केल्याने आपल्याला थोड चेंज वाटत आणि कूल लुक सुद्धा मिळतो.

- Advertisement -

डोक्यातील कोंडापासून मुक्ती मिळते

टाळूवर मृत त्वचेच्या पेशी जमा झाल्यामुळे कोंडा होतो. पुरुष आणि स्त्रियांना समान रीतीने प्रभावित करणारी ही एक सामान्य गोष्ट आहे. टक्कल केल्याने केसांचे सर्व कूप निघून जातात. हे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. यामुळे शक्यतो कोंडा होत नाही.

उन्हाळ्यात गरम होत नाही

केसांच्या कूपांमध्ये घाम येतो. साचलेल्या घामामध्ये धुळीचे कण जमा होतात. केस कापले तर गरमी जाणवत नाही. येथे एका गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे की केशवपण (टक्कल) केल्यानंतर कापड गुंडाळल्याशिवाय बाहेर पडू नये. यामुळे आपल्याला थेट सूर्यप्रकाश मिळू शकतो आणि आपल्याला उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो.

- Advertisment -

Manini