घरक्राइमनाशिकच्या पहिल्या बैलगाडा शर्यतीत जखमी झालेल्या 'त्या' व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी

नाशिकच्या पहिल्या बैलगाडा शर्यतीत जखमी झालेल्या ‘त्या’ व्यक्तीची मृत्यूशी झुंज अपयशी

Subscribe

नाशिक : नाशिक शहरातील म्हसरूळ गावठाण येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आमदार राहुल ढिकले आणि म्हसरूळ ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत बैलगाडीची जोरदार धडक बसून गंभीर जखमी झालेल्या एका चौसष्ठ वर्षाच्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान शनिवार ( दि. १०) रोजी रात्री ९:३० वाजता मृत्यू झालाय. श्रावण सोनवणे यांची ४ दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे.

पंचवटी येथील चाणक्यपुरी परिसरातील रहिवासी असलेले श्रावण सोनवणे असे मयत व्यक्तीचे नाव असून ६ जून ते शुक्रवार ९ जून पर्यंत त्यांच्यावर म्हसरूळ भागातील बिरसा मुंडा या खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. दरम्यान, त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. परंतु शनिवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -

दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत आमदार राहुल ढिकले आणि म्हसरूळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यामानाने म्हसरूळ गावठाण परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असल्याने शर्यत प्रेमी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. श्रावण सोनवणे हे देखील बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी त्याठिकाणी पोहचले. शर्यती रंगात आल्यानंतर त्यांचा थरार अनुभवताना सोनवणे अनवधानाने थेट बैल जेथून धावतात त्या बारीत जाऊन उभे राहिले. जेवढ्यात शर्यत सुरू झाली. एक बैलगाडी थेट सोनवणे यांचा दिशेने येऊ लागली. त्यांना काही समजण्याच्या आतच बैलगाडीची जोरदार धडक बसल्याने सोनवणे क्षणार्धात खाली कोसळले. तेवढ्यात बैलगाडीचे चाक त्यांच्या अंगावरून गेले आणि ते त्याच ठिकाणी बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले. बैलगाडीच्या धडकेत त्यांच्या छातीला व बरगड्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली होती. त्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -