नवऱ्याने मॅचिंग साडी, लिपस्टिक अन् बांगड्या न दिल्यामुळे बायकोने घेतली पोलिसात धाव

नवऱ्याने मॅचिंग साडी, लिपस्टिक अन् बांगड्या न दिल्यामुळे बायकोने घेतली पोलिसात धाव

नवऱ्याने मॅचिंग साडी, लिपस्टिक अन् बांगड्या न दिल्यामुळे बायकोने घेतली पोलिसात धाव

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी महिलांसंबंधित समस्येच निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक महिला डेस्कची स्थापना केली आहे. मिशन शक्ती अंतर्गत स्थापित केलेल्या या महिल्यांसाठीच्या डेस्कला काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. दररोज येथे महिला आपल्या तक्रारी दाखल करत आहेत. घरगुती हिंसाचाराशी संबंधित बरीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. परंतु चंदौल पोलीस स्टेशनमधील महिलाच्या डेस्कला एक अशी घटना घडली की तुम्ही वाचून आश्चर्य चकीत व्हाल.

नवऱ्याने मॅचिंग साडी, लिपस्टिक, बागडी आणि मेकअपचं सामान दिलं नाही म्हणून बायकोने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही अजब तक्रार ऐकल्यानंतर तिथले तैनात महिला पोलीस कर्मचारी थक्क झाले आहेत. या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारदार महिलेला खूप समजावले आणि त्यानंतर ती शांत झाली. मग तिला महिला पोलिसांनी घरी पाठवले. चंदौली कोतवाली क्षेत्रा अंतर्गत मझवार मोहल्लेमध्ये ही विवाहित महिला राहत होती. दरम्यान सोमवारी सकाळी महिलेने नवऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव होती.

महिलेने मॅचिंग साडी, लिपस्टिक, बागडी आणि मेकअपचं सामान दिलं नाही, एवढाच नवऱ्यावर आरोप न करता. तिने असं देखील म्हटलं आहे की, नवरा जेव्हा गॅस संपतो तेव्हा तो लाकडं पेटवून जेवण तयार करायला सांगतो.

या प्रकरणाबाबत चंदौलचे प्रभारी निरीक्षक अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, ‘महिला तक्रार घेऊन आली होती आणि हेल्प डेस्कवरील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिच्याशी बातचित केली. तसेच तिच्या नवऱ्याला फोनवरून समजावले. यानंतर महिला आपल्या घरी परत निघून गेली.’


हेही वाचा – खळबळजनक! वाशिममध्ये जळालेल्या अवस्थेत तरुणीचा आढळला मृतदेह!


 

First Published on: November 4, 2020 3:43 PM
Exit mobile version