Video : 56 डिग्री तापमानात गारठलेले हरिण बघून पर्यटक हैराण

Video : 56 डिग्री तापमानात गारठलेले हरिण बघून पर्यटक हैराण

Video : 56 डिग्री तापमानात गारठलेले हरिण बघून पर्यटक हैराण

हिवाळा सुरु झाला आहे आणि वातावरणात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.त्यातच उत्तर भारतातही कडाक्याची थंडी सुरु आहे. दरम्यान, आता नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरु आहे. अवघ्या काही दिवसांतच नववर्षाचे आगमन होत आहे.त्यामुळे बर्फवृष्टीचा आनंद अनुभवण्यासाठी अनेकजण पहाडी भागात जात असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहात का? घटत्या तापमानात जनावरांची हालत काय होत असेल.सोशल मिडियावर एका हरिणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत असे म्हटले जात आहे की, मायनस ५६ अंश तापमानामुळे एवढी थंडी होती की, एक चालणारे हरिण गोठले होते. त्याला पाहून पर्यटक हैराण झाले आहेत.

हा व्हिडीओ कजाकिस्तानचा असल्याची चर्चा सुरु आहे.या ठिकाणी -५६ डिग्री तापमान आहे.या भयानक थंडीमध्ये एक हरिण रस्त्याच्या कडेला उभे राहिले.त्याला पाहून असे वाटले की,बर्फाचा पुतळाच रस्त्याच्या कडेला उभा केला आहे.मात्र, काही अंतर चालल्यानंतर रस्त्याच्या मधोमध येताच तो पुन्हा गोठला. स्थानिक लोकांनी गोठवणाऱ्या हरिणाला पुन्हा पुन्हा पकडून त्याच्या अंगावरील बर्फ काढून टाकला .


हे ही वाचा – राजकीय पार्श्वभूमी नसतानाही ‘त्या’ लोकांमुळे मंत्री झालो, नितीन गडकरी भावूक


 

First Published on: December 26, 2021 4:29 PM
Exit mobile version