नवरी कोरोना पॉझिटिव्ह, तरी नवरा ऐकेना म्हणे ठरलं म्हणजे ठरलं!

नवरी कोरोना पॉझिटिव्ह, तरी नवरा ऐकेना म्हणे ठरलं म्हणजे ठरलं!

नवरी कोरोना पॉझिटिव्ह, तरी नवरा ऐकेना म्हणे ठरलं म्हणजे ठरलं!

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक धामाल किस्सा समोर येत आहे. प्रेमासाठी काही पण करणाऱ्या या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. लग्नाच्या तीन दिवस आधी नवरी मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आली. पण नवऱ्याचं ठरलं म्हणजे ठरलं. नवरी कोरोना पॉझिटिव्ह आली तरीही नवऱ्यांने तिच्या गळ्यात वरमाला घातली. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कॅलिफोर्नियात राहणाऱ्या पैट्रिक डेलगाडो आणि लॉरेन जिमेनेज या जोडप्याचे लग्न ठरले होते. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच नवरी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. पैट्रिक आणि लॉरेन त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करणार होते. त्या आधी त्यांनी आपली कोरोना चाचाणी करून घ्यायचे ठरवले. लग्नाच्या तीन दिवस आधीच नवरी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नवऱ्याने जुगाड करून शेवटी नवरीच्या गळ्यात वरमाला घातलीच.

पैट्रिक आणि लॉरेन यांच्या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये नवरी पहिल्या माळ्यावर उभी आहे आणि नवरा खाली. दोघांनी एकमेकांना दोरीने बांधले आहे. दोघांनी दोरीच्या सहाय्याने एकमेकांना पुष्पगुच्छ दिले. सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून दोघेही लग्नबंधतान अडकले.

दोघांच्या लग्नाचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरने त्यांचे फोटो शेअर केले आहेत. फोटोच्या कॅपश्नमध्ये त्याने असे लिहिले आहे की, जर तुमच्या लग्नाआधी तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर तुम्ही काय कराल? लग्नाचा दिवस तर निघून जाईल त्यानंतर लग्न कधी होईल हे तु्म्हाला माहिती नाही. अशा परिस्थितीत लग्नासाठी एक भन्नाट कल्पना करून पैट्रिक आणि लॉरेन यांनी लग्न केले आहे. पुढे तो असेही म्हणाला आहे की, अशा कठीण परिस्थितीतही तुम्ही एकमेकांना अंगठी घातलीत तुमच्यातील प्रेम असेच टिकून राहू देत. कठीण परिस्थितीत सकारात्मक राहण्यासाठी तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे, असे म्हणून त्यानी पैट्रिक आणि लॉरेनला शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – तुम्हालाही लागते सातत्याने भूक; मग अशी करा कंट्रोल

First Published on: December 4, 2020 4:49 PM
Exit mobile version