घरलाईफस्टाईलतुम्हालाही लागते सातत्याने भूक; मग अशी करा कंट्रोल

तुम्हालाही लागते सातत्याने भूक; मग अशी करा कंट्रोल

Subscribe

अशी करा भूक कंट्रोल

अनेकांना सातत्याने भूक लागत असते. जेवण असो किंवा नाश्ता काही केले तरी पुन्हा त्यांची खाण्याची तयारी असते. त्यामुळे वजन देखील वाढते. मग ते कसे कंट्रोल करावे? काय खावे? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. पण, ही भूक कंट्रोल करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास पदार्थ सांगणार आहोत. यामुळे तुमची भूक कंट्रोल राहू शकते.

अंडी

- Advertisement -

अंड्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते. तसेच अंडी हा प्रोटीनचा चांगला सोर्स असून त्याने वजन देखील कमी होण्यास मदत होते. एका उकडलेल्या अंड्यामध्ये १००हून कमी कॅलरी असतात. यामुळे कॅलरी इनटेक वाढत नाही.

सलाड

- Advertisement -

सलाड हे आरोग्यासाठी नेहमीच उत्तम असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सलाड एक उत्तम उपाय आहे. विशेष म्हणजे सलाडचे सेवन केल्याने लगेच भूक लागत नाही. तसेच पोट देखील भरलेले राहते.

चिया सीड्स

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करु शकता. चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे बराच वेळ भूक देखील लागत नाही..

डाळ

डाळीचे सेवन अधिक प्रमाणात करावे, यामुळे त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. विशेष म्हणजे डाळीत आर्यन, पोटॅशियम, थायमिन आणि मँगनीजसारखी पोष्कतत्वे असतात. डाळ हा प्रोटीन आणि फायबरचा चांगला सोर्स आहे. यामुळे सातत्याने भूक लागत नाही.

काकडी

काकडीमध्ये शरीर क्लिंज करण्याचे तसेच वजन कमी करण्याचे आणि शरीर निरोगी राखण्याचे गुणतत्वे असतात. तसेच काकडीचे सेवन केल्याने पोट देखील भरल्यासारखे होते. यामुळे भूक कंट्रोल करण्यासाठी काकडीचे सेवन करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -