व्हॅलेंटाईन डे निमित्त WeMetOnTwitter हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड, व्हायरल होत आहेत फनी मिम्स

व्हॅलेंटाईन डे निमित्त WeMetOnTwitter हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड, व्हायरल होत आहेत फनी मिम्स

#WeMetOnTwitter : प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असतो. प्रत्येक माणसाची एका खास माणसासोबत ओळख होते आणि त्यांची प्रेमकहाणी सुरू होते. सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे ला काही दिवसच बाकी आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. तर ट्विटरवर WeMetOnTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. युझर्स आपली लव्ह स्टोरी, आपल्या लाईफ पार्टनच्या खास गोष्टी सांगत आहेत.

ऐरवी लोक ट्विटरच्या माध्यमातून रोजच्या घडामोडी पाहत असतात. अनेकवेळा वादविवाद ट्विटर वॉर रंगताना दिसतात. मात्र असे अनेक जण आहेत ज्यांच्या आयुष्याच्या गाठी ट्विटरवर जुळल्या गेल्या आहेत. #WeMetOnTwitter च्या माध्यमातून २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये ३७०टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमी युगुलांसाठी व्हॅलेंटाईनमुळे खास असतो. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात #WeMetOnTwitter चे प्रमाण हे २८ टक्क्यांनी वाढल्याचे ट्विटकडून सांगण्यात आले आहे.

बऱ्याचदा असे झाले आहे की अनेक वेळा शोधून घेऊनही जोडीदार मिळत नाही त्यांना ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हक्काचे जोडीदार मिळाले आहे. एकीकडे लव्ह बर्ड्स #WeMetOnTwitter च्या माध्यमातून त्यांच्या लव्ह स्टोरी शेअर करत आहेत तर दुसरीकडे हा हॅशटॅगपाहून सिंगल लोक चांगलेच संतापल्याचे दिसत आहे. सिंगल लोकांसाठी अनेक धमाकेदार मिम्सचा पाऊस पडला असून सध्या ते मिम्स चांगलेच व्हायरल होत आहेत.

पाहा व्हायरल मिम्स


हेही वाचा – Promise Day च्या दिवशी जोडीदाराला द्या ‘ही’ खास वचनं अन् नातं करा…

First Published on: February 11, 2022 6:29 PM
Exit mobile version