CT Scan म्हणजे काय? कोरोना काळात सर्वाधिक वापर का केला जातोय?

CT Scan म्हणजे काय? कोरोना काळात सर्वाधिक वापर का केला जातोय?

CT Scan म्हणजे काय? कोरोना काळात सर्वाधिक वापर का केला जातोय?

कोरोनाचे निदान करण्यासाठी आपल्याकडे अन्टीजेन टेस्ट(Antigen test) आणि आरटीपीसीआर (RT-PCR) टेस्ट केली जाते. त्यातही RT-PCR टेस्ट महत्त्वाची समजली जाते. मात्र बऱ्याचदा RT-PCR टेस्टमधूनही निदान होत नाही त्यावेळी डॉक्टर सिटी स्कॅन (CT Scan) करण्याचा सल्ला देतात. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही CT Scan करताना विचार करुन CT Scan करण्याचा सल्ला दिला होता. सतत सिटी स्कॅन केल्याने धोका निर्माण होऊ शकतो. जे रुग्ण सतत सिटी स्कॅन करत असतील त्यांना कॅन्सरसारख्या आजाराचा धोका संभवतो असेही ते म्हणाले होते. मात्र कोरोनाचे निदान करण्यासाठी डॉक्टर सिटी स्कॅन करायला सांगतात. केवळ कोरोनाच नाही तर इतर आजारांसाठीही अनेकदा सिटी स्कॅन केले जाते. CT-Scan म्हणजे नेमकं काय? कोरोना काळात सर्वाधिक वापर का केला जातोय? CT-Scan चे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत?  जाणून घ्या.

CT Scan म्हणजे काय?

सिटी स्कॅन म्हणजे एक टोमोग्राफी स्कॅन असते. टोमोग्राफी म्हणजे कोणतीही गोष्ट छोट्या छोट्या भागात विभागून त्याचा अभ्यास करणे. CT Scan म्हणजे एक प्रकारचा थ्री़ डायमेंशनल एक्सरे आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी डॉक्टर जो स्कॅन करायला सांगतात त्याला HRCT Chest म्हणजेच छातीचा हाय रेज्युलेशन कंप्युटराइज टोमोग्राफी स्कॅन केली जाते. या स्कॅनमधून आपल्या फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्वरित कळते.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, सिटी वॅल्यु जितकी कमी असेल तितका धोका जास्त असतो तर सिटी वॅल्यु जास्त असेल तर धोका कमी असतो. कोरोनाचे निदान करण्यासाठी सिटी वॅल्यु ३५ नोंदवण्यात आली आहे. जर सिटी वॅल्यु ३५च्या खाली असेल तर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे. सिटि वॅल्यु ३५ पेक्षा जास्त असेल तर रुग्ण कोरोना निगेटिव्ह आहे असे समजले जाते. सिटी स्कोरमुळे फुफ्फुसांना किती नुकसान झाले आहे हे समजू शकते.

CT Scanचे फायदे व तोटे

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, सौम्य लक्षणे असणाऱ्यांना घरी आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तरीही ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन CT Scan करतात. सिटी स्कॅन म्हणजे ३०० चेस्ट X-Rayच्या बरोबरीचा आहे, त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात असे त्यांनी सांगितले होते. सिटी स्कॅनमध्ये रोग शोधण्यासाठी वेळ लागतो. यावेळेत सिटी स्कॅनमुळे लहान मुलांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो.

बऱ्याचदा काही लोकांना सिटी स्कॅन केल्यानंतर अँलर्जी होते. शरीरात खाज येणे,पुरळ उठणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. सिटी स्कॅनमुळे किडनीमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे किडनीशी निगडीत आजार सिटी स्कॅन करण्यापूर्वी डॉक्टरांना सांगणे गरजेचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला डायबेटीस सारखा आजार असेल तर त्या व्यक्तींनी सिटी स्कॅन करण्याआधी गोळ्या न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.


हेही वाचा – होम आयसोलेशनमध्ये आहात? ऑक्सिजन लेव्हल, शरीराचे तापमान दिवसभरात किती वेळा तपासाल? जाणून घ्या

 

First Published on: May 5, 2021 1:23 PM
Exit mobile version