Video: दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला समुद्राच्या मध्यात जिवंत सापडली

Video: दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला समुद्राच्या मध्यात जिवंत सापडली

Video: दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली महिला समुद्राच्या मध्यात जिवंत सापडली

एक महिला जी दोन वर्षांपासून बेपत्ता होती आणि ती अचानक किनाऱ्यापासून १.५ किमी अंतरावर समुद्रात जिवंत तरंगताना आढळल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ही घटना दक्षिण अमेरिकेतील कोलंबियामध्ये घडली आहे.

माहितीनुसार, दोन वर्षांपासून ही महिला तिच्या मुलीला दिसली नव्हती. पण अचानक २६ सप्टेंबर रोजी रोलांडो व्हिसबाल नावाच्या मच्छीमाराला ही ४६ वर्षीय बेपत्ता महिलेला पोर्तो कोलंबियाच्या किनाऱ्यापासून १.५ किमी अंतरावर तरंगताना दिसली. त्या मच्छीमाराने ताबडतोब त्या महिलेल्या पाण्यातून बाहेर काढले.

या ४६ वर्षीय महिलेचे नाव एंजेलिया गायतान (Angelica Gaitan) असे आहे. व्हिसबालने तिला कोलंबियाच्या किनाऱ्यावर पाहिले तेव्हा ती स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करीत होती. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये व्हिसबाल आणि त्याचा मित्र गायतान या महिलेला बोटीत खेचताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, तिला किनाऱ्यावर आणल्यानंतर खुर्चीत बसवून पाणी पाजताना लोकं दिसत आहेत. पण त्यानंतर तिची प्रकृती पाहून तिथल्या लोकांनी तिला रुग्णालयात नेले आणि तिला हायपोथर्मिया म्हणजेच (अंगाचे तापमान अगदी कमी असणे) असल्याचे समोर आले.

नक्की काय घडले महिलेसोबत?

या महिलेने पत्रकारांना सांगितले की, ‘तिला तिचा एक्स पती अपमानास्पद वागणूक देत होता. तिला घरात लॉक करून तो शौचालय म्हणून गार्डन वापरण्यास भाग पाडायचा. या सगळ्याला कंटाळून २०१८मध्ये ती पतीपासून पळून दूर गेली. ती सहा महिने रस्त्यावर राहिली. सुदैवाने तिला बचाव केंद्रावर राहायला एक जागा मिळाली. पण त्याठिकाणी देखील तिला अत्याचार सहन करावा लागला, अशी माहिती न्यू साईट डायरिया लिबटॅडने दिली आहे. एक्स पतीच्या राज्यात गेल्यानंतर पोलिसांनी तिला आश्रयस्थानी सोडले. पण त्यावेळेस तिने स्वतःचा जीव घेण्याचे कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले. तिला पाण्यातून कसे वाचवले हे सुद्धा तिच्या आठवणीत नव्हते.


हेही वाचा – हॉटेलमध्ये प्रियकरासोबत बायकोला पकडलं रंगेहाथ अन्


 

First Published on: September 30, 2020 6:01 PM
Exit mobile version