जॉबसाठी रिजेक्ट होताच महिलेने पाठवला भन्नाट ई-मेल; लगेच आला एचआरचा कॉल

जॉबसाठी रिजेक्ट होताच महिलेने पाठवला भन्नाट ई-मेल; लगेच आला एचआरचा कॉल

कोणत्याही कंपनीकडून जॉबसाठी एकदा का रिजेक्ट आला तर लोक त्या कंपनीकडे पुन्हा वळूनही पाहत नाही. पण काही लोक रिजेक्ट झाल्यानंतरही त्याच कंपनीत दुसऱ्या संधीची वाट पाहत बसतात. अशावेळी ही लोकं ह्यूमन रिसोर्सेस म्हणजे एचआर डिपार्टमेंटला इंप्रेस करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची तयारी करतात. अमेरिकेतही एका महिलेचा बायोडेटा पाहून सुरुवातीच्या चौकशीतच रिजेक्ट झाला. मात्र यानंतर त्या महिलेने कंपनीला असे काही उत्तर पाठवले ज्यानंतर तिला लगेचच इंटव्ह्यूसाठी कॉल आला.

नेमक प्रकरण काय?

या कंपनीने अमेरिकास्थित महिलेला 14 जुलै रोजी रिजेक्शनचा ई- मेल पाठवला होता. यानंतर महिलेने एक शिष्टाचार म्हणून ‘थँक्यू’ लिहून एचआरच्या मेलला उत्तर देणे अपेक्षित होते, परंतु तसे न करता महिनेले या ई-मेलमध्ये एक वाय थो मेम पाठवला होता. तिने विचार केला की, रिजेक्ट केलेल्या व्यक्तीचा मेल कोण पाहत, म्हणून तिने हा मेम पाठवला होता जो आता व्हायरल होत आहे. या अनोख्या ई-मेल रिप्लायमुळे कंपनीकडून महिलेला पुन्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले.

ई-मेलवरील रिप्लाय सोशल मीडियावर व्हायरल

@swedishswan नावाच्या एका टिकटॉक हँडलवरून महिलेचा ईमेल रिप्लायची स्टोरी शेअर करण्यात आली आहे. या स्टोरीचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे. व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या या महिलेने व्हिडीओमध्ये म्हटले की, शेड्यूलिंग कोऑर्डिनेटरच्या नोकरीसाठीच्या तिच्या अर्जावर कंपनीने रिजेक्शनचा ई-मेल पाठवला. ज्यावर रिप्लाय म्हणून महिलेने वाय थो मीम पाठवला. यानंतर अचानक तिला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला ज्यात तिला जॉबसाठी तिचे सिलेक्शन झाल्याचे सांगण्यात आले.

या महिलेचा हा भन्नाट किस्सा इंटरनेटच्या माध्यमातून बाकीच्या वृत्तवाहिन्यांपर्यंत पोहोचला. ज्यावर ती म्हणाली की ‘मला वाटते की, इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना अशा प्रकारचे मीम पाठवणाऱ्या व्यक्तीला भेटावेसे वाटेले असेल. नोकरी न मिळाल्याने मी निराश झालो होतो, पण या घटनेवर बनवलेल्या माझ्या व्हिडिओने मला फेमस केलेय. त्यामुळे आता नोकरी न मिळाल्यानेही मी खूप आनंदी आहे.

या प्रकरणावर इंटरनेटवर अनेक उलट्या सुलट्या प्रतिक्रिया येत आहेत. यात काही युजर्सनी म्हटले की, पूर्वी लोक रिप्लायमध्ये इमोजी पाठवत होते. परंतु आता असे दिसते आहे की, येत्या काळात सर्व जॉब रिजेक्शनला मीम्सद्वारे रिप्लाय दिले जाईल.


‘हर घर तिरंगा चळवळ’ मजबूत करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन; जाणून घ्या 22 जुलैचीच निवड का?


First Published on: July 22, 2022 2:31 PM
Exit mobile version