‘या’ देशात सापडला १,१७४ कॅरेटचा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा

‘या’ देशात सापडला १,१७४ कॅरेटचा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा

'या' देशात सापडला १,१७४ कॅरेटचा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा

आफ्रिकेच्या बोत्सवाना देशात दुर्मिळ असा एक अतिशय मोठा हिरा सापडला आहे. या हिऱ्याचा रंग पांढरा असून तो १,१७४ कॅरेटचा आहे. हा जगातील तिसरा मोठा हिरा असल्याचे सांगितले जात आहे. हिरा शोधणाऱ्या कंपनीने बुधवारी जाहीर केले की, गेल्या महिन्यातही या देशात एक प्रचंड मौल्यवान हिरा सापडला होता.

या सापलेल्या नवीन मौल्यवान हिऱ्याचा आकार तळ हाता एवढा आहे. कॅनेडियन डायमंट कंपनी लुकाराद्वारे १२ जून रोजी या हिऱ्याच शोध घेण्यात आला. यानंतर बुधवारी राजधानी गॅबोरोन शहरातील देशाच्या मंत्रिमंडळात या हिऱ्यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नसीम लहरी म्हणाले की, “आमच्यासाठी आणि बोत्सवानासाठीही हा क्षण ऐतिहासिक आहे. कारण जगातील सर्वात मोठ्या मौल्यवान रत्नांपैकी हा तिसरा मोठा हिरा आहे.

गेल्या महिन्यात बोत्सवाना डायमंड कंपनी देब्सवानाचेने सांगितले की, त्यांनी १ जून जगातील तिसरा मोठा हिरा सापडला आहे. हा आश्चर्यकारक हिरा १०९८ कॅरेटचा आहे. विशेष म्हणजे अगदी कमी वेळात या देशात आणखीण एका नवा मौल्यवान हिरा सापडला आहे.

या नवीन शोधामुळे बोट्सवानाला सर्वात मोठ्या मौल्यवान हिऱ्यांची जागतिक बाजारपेठ ठरत असल्याचा चर्चांना जोर धरून लागला आहे. आफ्रिकेतील बोत्सवाना हे शहर प्रमुख हिरा उत्पादकांचे शहर आहे. सध्या जगातील सर्वात मोठा अस्तित्वात असलेला हिरा हा ३ हजार १०६ कॅरेटचा आहे. हा हिरा दक्षिण आफ्रिकेत १९०५ मध्ये सापडला होता. कलिनन नावाने हा हिरा ओळखला जातो.


मीडिया स्टार बनली २३ महिन्यांची ठेंगणी गाय


 

First Published on: July 8, 2021 4:09 PM
Exit mobile version