घरट्रेंडिंगमीडिया स्टार बनली २३ महिन्यांची ठेंगणी गाय

मीडिया स्टार बनली २३ महिन्यांची ठेंगणी गाय

Subscribe

रानी गायीची लांबी ६६सेंटीमीटर (२६इंच) असून तिचे वजन २६ किलो इतके आहे.

सध्या सोशल मीडियावर एका गाय तूफान व्हायरल होत आहे. केवळ सोशल मीडियाच नाही तर प्रत्यक्षात गाय पाहण्यासाठी लोकांनी गायीच्या मालकाच्या घराबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. बांग्लादेशमधील ही गाय जगातील सर्वात ठेंगणी गाय म्हणून ओळखली जात आहे. ५१ सेंटीमीटर (२०इंच) लांब अशी ही गाय पाहण्यासाठी हजारो लोक बांग्लादेशमध्ये जात आहे. ही गाय सोशल मीडियाच्या माध्यमातून एका रात्रीत स्टार झाली आहे. या गायीचे नाव आहे रानी गाय. मात्र तिच्या प्रसिद्धीमुळे तिला मीडिया स्टार या नावाने ओळखण्यात येत आहे. ही गाय केवळ २३ महिन्यांची आहे. अनेक लोक फार उत्सुकतेने ही मीडिया स्टार गाय पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. अनेक जणांनी या रानी गायीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

या रानी गायीची लांबी ६६सेंटीमीटर (२६इंच) असून तिचे वजन २६ किलो इतके आहे. ही गाय गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये १०सेंटींमीटर असलेली जगातील सर्वात छोटी गाय म्हणून तिची नोंद करण्यात आली आहे. पशु चिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेनेटिक इनब्रीडींग मधून रानी गायीचा जन्म झालाया त्यामुळे तिची वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे.

- Advertisement -

शिकोर एग्रो फार्मच व्यवस्थापक एमए हसन हवालदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये असताना देखील लोक लांबून रानी गायीला पाहण्यासाठी येत आहेत. गेल्या तीन दिवसात १५ हजारांहून अधिक लोक रानी गायीला पाहण्यासाठी आलेत. रानी गायीच्या मालकाने सांगितले, रोज अनेक माणसे रानी गायीला पाहण्यासाठी येत असल्याने आता आम्ही कंटाळलो आहोत. आमची गाय इतकी प्रसिद्ध होईल असे आम्हाला वाटले नव्हते. कोरोना महामारीच्या काळात देखील रानी गाय पाहण्यासाठी लोक इतकी गर्दी करतील असे देखील वाटले नव्हते.

- Advertisement -

हेही वाचा – गंगा नदीच्या पाण्यात जीवघेणा कोरोना व्हायरस? वाचा संशोधनातून समोर आलेली माहिती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -