Coronavirus: जनता लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Coronavirus: जनता लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

चीनमधील वुहान शहरात उद्यास आलेल्या करोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत करोनाग्रस्तांचा संख्या ३ लाखांहून अधिक झाली आहे. तसंच देशभरात देखील करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ३९० पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे करोना व्हायरस रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र अनेकजण लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अनेकजण लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपया आपणच आपला बचाव करा वाचवा, आपल्या परिवार बचाव करा, नियमांचे पालन करा. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायद्याचे पालन करावे, अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळीपूर्वी ट्विट केलं आहे.

तसंच याच संदर्भात देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, करोनाविरुद्ध लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावला आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका.

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ७४ वरून ८९ वर पोहोचली आहे. यामध्ये तब्बल १४ रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले असून एक रुग्ण पुण्यामध्ये आढळला आहे. तसंच मुंबईत आणखी एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus: काँग्रेसने केंद्र सरकारकडे केल्या १० मागण्या!


 

First Published on: March 23, 2020 10:56 AM
Exit mobile version